सुधारित पटेल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारित पटेल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सुधारित पटेल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सुधारित पटेल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

rat१४२२f.txt

बातमी क्र.. २२ (पान ५ साठी)
(टीप- यापूर्वीची बातमी रद्द करून ही सुधारित बातमी घ्यावी.)

फोटो ओळी
-rat१४p१३.jpg-
६८४७८
सुमैय्या पटेल

सुमैय्या पटेल दिव्यांग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १४ ः आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेची विद्यार्थिनी सुमैय्या पटेल हिला दिव्यांग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम पुण्यात झाला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
आरोग्याच्या कारणास्तव ती पुण्यात जाऊ शकली नव्हती. सामान्यांच्या बुद्धीच्या कक्षेपलीकडले भावविश्‍व काहींच्या वाट्याला येते आणि सुरू होतो एक नवीन प्रवास. स्वत:ला सिद्ध करणारी अशीच एक कर्तबगार मुलगी म्हणजे नूरजहाँ नावडे यांची कन्या सुमैय्या पटेल. आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेत ती व्यावसायिक प्रशिक्षण घेत असून राजिवडा आदमपूर येथे राहते. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पुरस्कार पुणे येथील नामांकित शिक्षण-समाजसेवा संस्था अर्हम फाउंडेशनमार्फत घोषित करण्यात आला. अर्हम फांउडेशन ही संस्था शैक्षणिक, समाजसेवेचे कार्य गेली पाच वर्षापासून करत आहे. त्यांचा चौथा पुरस्कार सोहळा होता. समाजातील दुर्गम, दिव्यांगांना प्रोत्साहित करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट साधत ही संस्था कार्य करत आहे. सुमैय्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आविष्कार संस्थेने तिचे अभिनंदन केले.