क्रीडा स्पर्धेत मुणगे हायस्कूलची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा स्पर्धेत मुणगे हायस्कूलची बाजी
क्रीडा स्पर्धेत मुणगे हायस्कूलची बाजी

क्रीडा स्पर्धेत मुणगे हायस्कूलची बाजी

sakal_logo
By

६८५०३

क्रीडा स्पर्धेत मुणगे हायस्कूलची बाजी

तालुकास्तरीय स्पर्धा; विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १४ ः येथील भगवती हायस्कूल व (कै.) वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसच्या विद्यार्थ्यांनी देवगड तालुकास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
यात १७ वर्षे मुली ४×१०० रिलेमध्ये मुणगे हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. तर २०० मीटर धावणे- रिया सावंत (प्रथम), ४०० मीटर धावणे-सृष्टी सावंत (प्रथम), ८०० मीटर धावणे-प्रेक्षा सावंत (प्रथम), १५०० मीटर धावणे- प्रेक्षा सावंत (प्रथम), लांब उडी-सृष्टी सावंत (प्रथम), १०० मीटर हर्डल्स-प्रेक्षा सावंत (द्वितीय), १४ वर्षे मुली ३ किलोमीटर चालणे-पल्लवी मुणगेकर (प्रथम), १७ वर्षे मुलगे १०० मीटर धावणे-सुमित चव्हाण (द्वितीय), १०० मीटर हर्डल्स-आत्माराम बागवे (प्रथम), तुषार कामतेकर (तृतीय). ४०० मीटर धावणे-यश सावंत (द्वितीय), १५०० मीटर धावणे- तेजस कदम (तृतीय), ३००० मीटर धावणे-विराज मुणगेकर (द्वितीय), भालाफेक-तेजस घाडी (प्रथम), सुमित चव्हाण (द्वितीय). १४ वर्षे मुलगे गोळाफेक-भूषण खरात (तृतीय), भालाफेक-युवराज मेस्त्री (प्रथम), भूषण खरात (द्वितीय).
दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांना पवन स्पोर्ट्स फाउंडेशन मुणगेचे मुख्य प्रशिक्षक अनिकेत पाटील, प्रशालेचे शिक्षक एन. जी. वीरकर, गुरुप्रसाद मांजरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था व प्रशालेच्यावतीने यशस्वी विद्यार्थी व प्रशिक्षकांचे मुख्याध्यापक एम. बी. कुंज यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी प्रसाद बागवे, गौरी तवटे, गुरुप्रसाद मांजरेकर, हरीश महाले, झुंजार पेडणेकर आदी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, माजी कार्याध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, शाळा समिती अध्यक्ष नीलेश परुळेकर, व्यवस्थापक आबा पुजारे, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, पवन स्पोर्ट्स फाउंडेशन अध्यक्ष प्रशांत सारंग, डॉ. मनोज सारंग, सरपंच साक्षी गुरव, पोलिस पाटील साक्षी सावंत, मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---
इतर स्पर्धांचा निकाल
१९ वर्षे मुली (ज्युनियर कॉलेज) १०० मीटर रिले-द्वितीय क्रमांक, २०० मीटर धावणे-साक्षी घाडी (प्रथम). १९ वर्षे मुलगे (ज्युनिअर कॉलेज) २०० मीटर धावणे-राहुल घाडी (प्रथम), उंचउडी-प्रतीक घाडी (प्रथम), राहुल घाडी (द्वितीय). लांबउडी-प्रतीक घाडी (प्रथम) यांनी यश मिळविले. दरम्यान, प्रथम दोन क्रमांक प्राप्त स्पर्धकांची निवड ओरोस येथील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.