कुडाळात मतदान यंत्रे सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात मतदान यंत्रे सील
कुडाळात मतदान यंत्रे सील

कुडाळात मतदान यंत्रे सील

sakal_logo
By

६८५०४

कुडाळ तालुक्यासाठी मतदान यंत्रे सील
ग्रामपंचायत निवडणूक; पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्र सील प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. यासाठी १९ टेबलांवर बारा फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया केली. या वेळी मतदान केंद्राबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कुडाळ तालुक्यात एकूण ५२ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतदान १८ ला, तर २० ला मतमोजणी होणार आहे. तालुक्यात होणाऱ्या या मतदानाची मतदान यंत्रे बुधवारी मतपत्रिकेसह सील करण्यात आली. तालुक्यात १८६ मतदान केंद्रे असून या १८६ केंद्रांवर १८६ मतदान यंत्रे असणार आहेत. ही सर्व मतदान यंत्रे आज येथील कुडाळ हायस्कूल येथील बॅडमिंटन सभागृह येथे सील करण्यात आली. या वेळी मतदान यंत्र मतदानासाठी योग्य असल्याची उमेदवार व प्रतिनिधी यांच्यासमोर खात्री करण्यात आली. त्यानंतर यंत्रात मतपत्रिका घालून ही मतदान यंत्रे सील करण्यात आली. कमीत कमी कालावधीत मतदान यंत्रे सील करण्यासाठी १९ टेबले लावण्यात आली होती. एकूण १२ फेऱ्यांमध्ये ही मतदान यंत्रे सील करण्यात आली. यासाठी सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. उमेदवार तथा प्रतिनिधींशिवाय अन्य कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली. तहसीलदार अमोल पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष उपस्थितीत मतदान यंत्र सील करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही मतदान यंत्रे आता कुडाळ हायस्कूल येथील स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात येणार असून यासमोर चोवीस तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पाठक यांनी दिली. मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण मतदान प्रक्रियेबाबतची दोन्ही प्रशिक्षणे पूर्ण झाली आहेत. मतदानादिवशी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी एकूण ९३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये केंद्राध्यक्ष, एक ते तीन मतदान अधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी व शिपाई यांचा समावेश असणार आहे.