भोस्ते घाटात सिमेंटचा ट्रक उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोस्ते घाटात सिमेंटचा ट्रक उलटला
भोस्ते घाटात सिमेंटचा ट्रक उलटला

भोस्ते घाटात सिमेंटचा ट्रक उलटला

sakal_logo
By

rat१४३४.txt

(पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat१४p१६.jpg ः
६८५२३
खेड ः भोस्ते घाटात अवघड वळणावर पलटी झालेला मालवाहू ट्रक.
---
भोस्ते घाटात सिमेंटचा ट्रक उलटला

खेड, ता. १४ ः मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील त्या अवघड वळणार आज पुन्हा एकदा सिमेंट वाहून नेणारा ट्रक उलटला. या अपघातात मनुष्यहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली आहे. भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाकडून तब्बल १० गतिरोधक बसवण्यात आले आहेत; मात्र तरीही या अवघड वळणावर होणाऱ्या अपघातांची मालिका थांबलेली नाही. ट्रक सिमेंट घेऊन चिपळूणहून मुंबईकडे चालला होता. तीव्र उतारावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. ट्रक उलटल्यानंतर सिमेंटच्या गोणी रस्त्यावर विखुरल्या गेल्या. या अपघातात चालक सुदैवाने वाचला असला तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.