Fri, Feb 3, 2023

आनंद बंदरकर यांचे निधन
आनंद बंदरकर यांचे निधन
Published on : 14 December 2022, 1:57 am
rat14p17.jpg
68524
आनंद बंदरकर
----------
आनंद बंदरकर निधन
रत्नागिरी, ता. १४ः शहरातील प्रसिद्ध मेकॅनिक आनंद बंदरकर (वय ४९) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. उमद्या स्वभावाचा, प्रत्येकाच्या मदतीला धावणारा एक सच्चा मित्र अशी त्यांची ओळख होती. वडिलांचा मोटार दुरुस्तीचा व्यवसाय त्यांनी मोठ्या प्रमाणात विस्तारला. रत्नागिरीतील एमआयडीसी येथे आनंद मोटर्स या नावाने त्यांचे वर्कशॉप होते. आपला व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी जुन्या गाड्या ठेवण्याचादेखील छंद जोपासला. २२ ऑक्टोबरला फियाट गाडीचा ५० वा वाढदिवसदेखील साजरा केला होता. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने आणलेल्या वैकुंठ रथाची देखभाल मोफत करण्याची जबाबदारीदेखील त्यांनी स्वीकारली होती.