वेंगुर्लेत आजपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत आजपासून
कुत्र्यांचे निर्बिजीकरण
वेंगुर्लेत आजपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण

वेंगुर्लेत आजपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण

sakal_logo
By

वेंगुर्लेत आजपासून
कुत्र्यांचे निर्बिजीकरण
वेंगुर्ले, ता. १४ ः शहरामध्ये नगरपरिषदेमार्फत उद्या (ता.१५) पासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अँटी रेबिज लसिकरण मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती येथील नगरपरिषदेमार्फत देण्यात आली. शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्याबाबत शहरातील नागरिकांकडून येणाया तक्रारींचा विचार करून येथील नगरपरिषदेमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अँटी रेबिज लसीकरण मोहीम उद्यापासून राबविण्यात येणार आहे. निर्मिती पिपल्स अँड ऍनिमल वेलफेअर सोसायटी, नागपूर या संस्थेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अँटी रेबीज लसिकरण करण्यात येणार आहेत. या अंतर्गत शहरातील विविध वार्डामधून भटके कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले खाजगी कुत्रे रस्त्यावर न सोडता आपल्या आवारामध्ये राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.