सहकारी संस्था निवडणुका पुन्हा मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी संस्था निवडणुका पुन्हा मार्गी
सहकारी संस्था निवडणुका पुन्हा मार्गी

सहकारी संस्था निवडणुका पुन्हा मार्गी

sakal_logo
By

सहकारी संस्था निवडणुका पुन्हा मार्गी
स्थगिती उठविली ः तीन खरेदी-विक्री संघांसाठी लढत
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत त्या टप्प्यावर २० डिसेंबरपर्यंत थांबविण्याचे आदेश २९ नोव्हेंबरला दिले होते. ही स्थगिती आज शासनाने उठविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रखडलेला कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले तालुका खरेदी-विक्री संघांचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम आहे त्या टप्प्यावरून २१ पासून सुरू होणार आहे.
राज्यातील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १८ ला होत आहेत. त्याची मतमोजणी २० ला आहे. त्याचवेळी ७ हजार १४७ सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. ग्रामपंचायत व सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे क्षेत्र एकच असते. त्यामुळे एकाचवेळी दोन्ही निवडणुका झाल्या, तर गावात तणाव निर्माण होऊ शकतो. ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या जास्त असते. त्यांचे कार्यक्षेत्र तालुक्यात असते. अनेक ठिकाणी पूर्ण जिल्ह्यात असते. त्यामुळे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक विना अडथळा पार पडावी, तसेच मतदारांना यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला होता. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या काळात जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले तालुका खरेदी-विक्री संघ यांच्यासह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु होत्या. ही प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर थांबविण्याचे आदेश २९ नोव्हेंबरला देण्यात आले होते. आता ही स्थगिती उठल्याने ता. २१ पासून जिल्ह्यातील रखडलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.