तालुका मैदानी स्पर्धेत फोंडाघाट हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुका मैदानी स्पर्धेत फोंडाघाट हायस्कूलचे यश
तालुका मैदानी स्पर्धेत फोंडाघाट हायस्कूलचे यश

तालुका मैदानी स्पर्धेत फोंडाघाट हायस्कूलचे यश

sakal_logo
By

तालुका मैदानी स्पर्धेत
फोंडाघाट हायस्कूलचे यश
फोंडाघाट, ता. १५ : कणकवली शहरातील मुडेश्‍वर मैदान येथे झालेल्‍या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल, फोंडाघाटच्या १७ वर्षे आणि १९ वर्षे गटातील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
१७ वर्षाखालील गटामध्ये सौरभ स्वप्निल रावराणे याने १०० मी धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केली. शुभम चंद्रकांत तेली याने तिहेरी उडी मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १९ वर्षाखालील गटामध्ये आनंद तानाजी गावडे याने १०० मिटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक, रामचंद्र अंबाजी बोडेकर याने ४०० मिटर धावणे प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक, आनंद तानाजी गावडे याने ८०० मी धावणे प्रकारामध्ये प्रथम क्रमांक, प्रथमेश प्रमोद लाड याने १५०० मी धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक, यश संदीप दळवी याने १५०० मी धावणे मध्ये तृतीय क्रमांक प्रथमेश प्रमोद लाड याने गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर हर्ष अभिजित सावंत याने गोळाफेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.