
रिक्षा-मोटारीमध्ये अपघात; एक जखमी
kan154.jpg
68577
कणकवली : येथील तहसील कार्यालयासमोरील सेवा रस्त्यावर रिक्षा आणि मोटारमध्ये अपघात झाला.
रिक्षा-मोटारीमध्ये अपघात; एक जखमी
कणकवली, ता. १४ : शहरातील तहसील कार्यालयासमोरील मिडलकटवर मोटारीला सहा आसनी रिक्षाची धडक बसून अपघात झाला. या अपघातात रिक्षातील प्रवासी किरकोळ जखमी झाला. तर यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
शहरात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार ठिकठिकाणी मिडलकट ठेवले आहेत. मात्र सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मिडलकटवरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे शहरात वारंवार अपघात होत आहे. कणकवली तहसील कार्यालयाकडून निघालेली मोटार मिडलकट ओलांडून सेवा रस्त्यावर आली. या दरम्यान गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सहा आसनी रिक्षाची मोटारीला मागाहून धडक बसली. अचानक मोटार समोर आल्याने चालकाला रिक्षावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. या अपघातामध्ये रिक्षातील प्रवासी मारूती पाटील हे किरकोळ जखमी झाले.