8 जानेवारीला जिल्हा सायकल संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

8 जानेवारीला जिल्हा सायकल संमेलन
8 जानेवारीला जिल्हा सायकल संमेलन

8 जानेवारीला जिल्हा सायकल संमेलन

sakal_logo
By

rat१५१३.txt

(टुडे ३ साठी, अॅंकर)

रत्नागिरीत रंगणार ‘जिल्हा सायकल संमेलन’

८ जानेवारीला आयोजन ; रत्नागिरी सायकलिस्ट क्लबलाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. १५ : जिल्हा सायकल संमेलन ८ जानेवारी २०२३ ला आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित या संमेलनात चिपळूण, दापोली, खेड सायकलिंग क्लबचे सदस्यांसह जिल्हा, राज्य व व देशातील नामवंत सायकलतज्ज्ञ व सायकलप्रेमी सहभागी होणार आहेत. टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत संमेलन रंगणार आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून या संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने अवघी रत्ननगरी सायकलमय होणार आहे.


यावर्षातील जानेवारी महिन्यात खेड येथे पहिले सायकल संमेलन उत्साही वातावरणात झाले होते. त्यानंतर प्रतिवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सायकल संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, देवरुखमध्ये सायकलिस्ट क्लब कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरात रत्नागिरी आणि आसपासच्या पट्ट्यात सायकल चळवळ वाढावी म्हणून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने भरपूर प्रयत्न केले आहेत. दररोज किमान २० ते ५० किमी सायकलिंग करणारे सदस्यही रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमध्ये आहेत.
विधी दिनानिमित्त सायकल राईड, नेहरु युवा केंद्राची स्वस्थ इंडिया सायकल राईड आणि जिल्हा निवडणूक शाखेची मतदार जनजागृती सायकल फेरीत क्लबने सक्रिय सहभाग घेतला. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व जनजागृती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सायकल फेरी काढली. तसेच किंग ऑफ कुंभार्ली स्पर्धा, दापोली विंटर सायक्लोथॉन, सह्याद्री रेंडोनियर्स आयोजित बीआरएम, सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित सायक्लोथॉनमध्ये क्लबचे सदस्य सहभागी झाले होते. यामुळे अल्पावधीतच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब हा जिल्ह्यातील एक लोकप्रिय क्लब बनला. त्यामुळेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबकडे संमेलनाचे यजमानपद आले आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी मारुती आळीतील भावना ज्वेलर्स येथे नीलेश शहा आणि मारुती मंदिरमधील हॉटेल गोपाळ येथे लाल्याशेठ खातू आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी आणि जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे.


विविध विषयांवर मार्गदर्शन
देशात सायकलक्रांत केलेले, सायकलिंगचे रेकॉर्ड नावावर असलेले, विविध स्पर्धात देशाचे प्रतिनिधित्व केलेले जवळपास २०० हून अधिक सायकलप्रेमी या संमेलनात सहभागी होणार आहेत. सायकलप्रेमींना उपयुक्त माहितीसह मार्गदर्शन संमेलनातून मिळावे, यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाल आणि तरुण वयातील सायकलिंग, गृहस्थाश्रमातील सायकलिंग, निवृत्तीनंतरचे सायकलिंग, होम मिनिस्टरचं सायकलिंग आणि त्याच्याबरोबर संसार, नोकरीतील समन्वय आदी विषयांचा समावेश आहे.