
देवगडच्या युथ फोरमचे निर्वासित प्रथम
rat१५१४. txt
बातमी क्र.१४ (टुडे पान २ साठीमेन)
फोटो ओळी
-rat१५p१.jpg-
६८५८०
रत्नागिरी ः राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या निर्वासित या नाटकातील एक क्षण.
---
राज्य नाट्य स्पर्धेवर सिंधुदुर्गचे वर्चस्व
देवगडचे निर्वासित प्रथम ; मालवणचे बझर द्वितीय
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १५ ः महाराष्ट्र हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून पहिले तीन क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटकांना मिळाले. देवगड येथील युथ फोरम नाट्य संस्थेने सादर केलेल्या निर्वासित या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली. गावातून मुंबईत गेल्यावर, बीएमसी चाळीत राहणाऱ्या माणसांचं जीवन आणि त्यांचे कौटुंबिक वास्तव येथील कलाकरांनी अभिनयातून उभं केल होतं.
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर आणि रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीतत या स्पर्धा उत्साही वातावरणात झाल्या होत्या. या स्पर्धेत एकूण २५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या स्पर्धेतील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मालवण शाखेने सादर केलेल्या बझर नाटकाला द्वितीय, तर मालवण येथील स्वराध्या फाऊंडेशनच्या श्याम तुझी आवस इली रे नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सतीश शेंडे, श्रीमती मानसी राणे आणि ईश्वर जगताप यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
प्राथमिक फेरीचा अन्य निकाल अनुक्रमे असा ः
दिग्दर्शन ः प्रथम- स्वप्नील जाधव (नाटक -निर्वासित), द्वितीय- अभय कदम (बझर), प्रकाशयोजना- श्याम चव्हाण (निर्वासित), श्याम चव्हाण (बझर), नेपथ्य- अभय वालावलकर (बत्ताशी), सचिन गावकर (संकासुरा ते महावीरा), अदिती दळवी (बत्ताशी), उत्कृष्ट अभिनय- रौप्यपदक- प्रफुल्ल घाग (निर्वासित) व शुभदा टिकम (बझर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ः प्राजक्ता वाड्ये (भिंती), योगिता सावंत (श्याम तुझी आवस इली रे), कीर्ती चव्हाण (या व्याकुळ संध्यासमयी), भाग्यश्री पाणे (ए आपण चहा घ्यायचा का), सोमा मराठे (ऋणानुबंध), योगेश जळवी (मधुमाया), प्रशाद करंगुटकर (खर सांगायचं तर), प्रसाद खानोलकर (पासर-पॉन), कृष्णकांत साळवी (मावळतीचा इंद्रधनू), दीपक माणगावकर (मड वॉक) आदीचा समावेश आहे.