
निमखऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन
rat१५१५.txt
९ डिसेंबर टुडे पान चार
(टुडे पान ३ साठी सदर)
आधुनिक मत्स्यपुराण.............लोगो
फोटो ओळी
-rat१५p२.jpg ः
६८५८१
डॉ. केतन चौधरी
निमखऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन
*संवर्धन तलाव
कोळंबी संवर्धनासाठी आयताकृती किंवा चौरस तलाव योग्य आहेत. वाराच्या दिशेला समांतर तलावाचे बांधकाम केल्याने वाऱ्यामुळे पाण्याची हालचाल होऊन नैसर्गिकरित्या तलावातील पाण्यात प्राणवायूची वाढ होऊ शकते. तलावामध्ये किमान १ मीटर आणि जास्तीत जास्त १.५ मीटर खोली असणे आवश्यक आहे. तलावाचा उतार हा पाणी आत-बाहेर येणाऱ्या गेटच्या दिशेने असावा त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन तलाव कोरडा होण्यास मदत होते.
*तलावाची तयारी
तलावाच्या तयारीत अनेक बाबी आहेत. नव्याने बनवलेले तलाव आणि विद्यमान तलाव यांत कोळंबी बीज सोडण्यापूर्वी आणि त्यानंतरच्या प्रत्येक पिकाच्या आधी तलावाची पूर्वतयारी करणे फार गरजेचे आहे. कोळंबीला स्वच्छ तलावाचा आधार आणि योग्य स्थिर पाण्याची गुणवत्ता प्रदान करणे हे तलावाच्या तयारीचे मुख्य उद्दिष्ट आहेत. तलावाच्या तयारीत सामान्यत: साफसफाई, तलाव सुकवणे, तलावाची देखभाल जसे की तलावाच्या बांधावरील बिळे बुजवणे, बांधांचा उतार दुरुस्त करणे, पाणी आत-बाहेर येणाऱ्या गेटची दुरुस्ती करणे, चुना मारणे, तलावाच्या तळातील माती ट्रॅक्टरद्वारे खणणे आणि खणलेला तळ परत योग्य उतारासह सपाट करणे, तलावात पाणी भरणे, पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे, तलावात एरेटर्स लावणे या बाबींचा समावेश होतो.
*कोळंबी साठवणूक
कोळंबी साठवणुकीसाठी मुख्यत: टायगर कोळंबी किवा व्हेनामी कोळंबी या जातीचा वापर केला जातो. कोळंबी साठवणुकीसाठी जे बीज वापरले जाते त्याला पोस्ट लार्वे असे म्हणतात. कोळंबी तलावातील पोस्ट लार्वे साठवणूक ही पिकाच्या यशासाठीची एक महत्वाची प्रक्रिया आहे. चांगल्या आणि उच्च दर्जाच्या कोळंबी उत्पादनासाठी दर्जेदार बिजाची आवश्यकता असते. बीज तलावात सोडताना तलावातील पाण्याच्या मापदंडाशी एकरूप करून सोडले जाते. साठवणूक घनता सामान्यत: संवर्धन कालावधी, कोळंबीचे वजन आणि व्यवस्थापन प्रणालीवर अवलंबून असते.
*खाद्य व्यवस्थापन
कोळंबीचे पोषण हे शेतकऱ्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या कृत्रिम खाद्यावर आणि तलावातील जीवांवर (शैवाल, लहान बेंथिक इन्व्हर्टेब्रेट्स इ.) यावर आधारित असते. खाद्य व्यवस्थापन म्हणजे खाद्य देण्याचे नियंत्रण आणि वापर अशाप्रकारे की कमीतकमी खाद्य वाया घालवणे आणि उत्कृष्ट अन्न रूपांतरण प्रमाण (एफसीआर) प्राप्त करून उत्पादनात जास्तीत जास्त वाढ करणे. साधारणतः कोळंबी संवर्धनात दररोज चार ते पाचवेळा खाद्य दिले जाते.
* नमूना चाचणी
दर आठ ते दहा दिवसांनी तलावातील कोळंबीची नमूना चाचणी, त्यांचे वजन आणि आरोग्य तपासणीसाठी केली जाते. कोळंबीच्या वजनावरून खाद्याचे प्रमाण ठरवले जाते.
*काढणी
कोळंबी काढणी ही कोळंबीचा योग्य आकार-वजन, चांगली आरोग्याची स्थिती (त्यावेळेस कोणताही रोग नाही), योग्य ऑर्गनोलिप्टिक वैशिष्ट्ये आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार यासारख्या सर्व बाबींचा विचार करून केली पाहिजे. काढणी ही आंशिक काढणी आणि संपूर्ण काढणी अशा प्रकारे करता येते. आंशिक काढणी ही पाग किवां ओढ जाळे (ड्रॅग नेट) द्वारे केली जाते तर संपूर्ण काढणीमध्ये तलावातील संपूर्ण पाणी रिकामे केले जाते.
(लेखक मत्स्यसंपत्ती अर्थशास्त्र आणि विस्तार शिक्षण विभाग, मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे प्राध्यापक आहेत.)