भाषणाला कृतीचे रूप देणारे गोपीनाथ मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाषणाला कृतीचे रूप देणारे गोपीनाथ मुंडे
भाषणाला कृतीचे रूप देणारे गोपीनाथ मुंडे

भाषणाला कृतीचे रूप देणारे गोपीनाथ मुंडे

sakal_logo
By

rat१५१७.txt

(टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat१५p४.jpg ः
६८५८३
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे सहकोषाध्यक्ष सुनील मेहता.

भाषणाला कृतीचे रूप देणारे गोपीनाथ मुंडे

कर्मवीर दादा इदाते ; मुंडे महाविद्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन

मंडणगड, ता. १५ ः भाषणाला कृतीचे रूप देणारे गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तिमत्व होते. सामाजिक, राजकीय आणि शिक्षणक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. असे प्रतिपादन कर्मवीर दादा इदाते यांनी केले.

लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक विभाग, महिला विकास कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, निसर्गमंडळ, विस्तार विभागातर्फे लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारत सरकारच्या भटक्या, अर्धभटक्या व विमुक्त जाती, जमाती विकास व कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष, नीती आयोग उपसमितीचे सदस्य व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांचे ‘लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचे कार्य व जीवन’ या विषयावर व्याखान झाले. इदाते म्हणाले, आणीबाणीची निष्पत्ती म्हणजे गोपीनाथजी मुंडे यांचा उदय होय. वंचित समुहाला सत्तेत आणण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले आहे. शाहू-फुले-आंबेडकर विचारधारांच्या लोकांना त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आणले म्हणून गोपीनाथजी मुंडे यांना आधुनिक सामाजिक व राजकीय क्षेत्राचे शिल्पकार म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या वेळी संस्थेच्या अध्यक्षा संपदा पारकर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या शालिनी कराड या ऑनलाइन उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे सहकोशाध्यक्ष सुनील मेहता, संचालक आदेश मर्चंडे, संतोश चव्हाण, जयराम सानप, बप्पासाहेब खराटे आदी मान्यवर उपस्थित होते.