युवा आघाडीतर्फे कोळकेवाडीत आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवा आघाडीतर्फे कोळकेवाडीत आरोग्य शिबिर
युवा आघाडीतर्फे कोळकेवाडीत आरोग्य शिबिर

युवा आघाडीतर्फे कोळकेवाडीत आरोग्य शिबिर

sakal_logo
By

rat१५१०.txt

(टुडे पान ३ साठी)
(टीप- जाहिरातदार आहेत. १३ तारखेला सोडलेली होती, ती रद्द करून ही सुधारित घ्यावी.)

युवा आघाडीतर्फे कोळकेवाडीत आरोग्य शिबिर

विविध मोफत तपासण्या ; १०० हून अधिक जणांना लाभ

चिपळूण, ता. १५ ः येथील संत गोरा कुंभार विकास मंडळ व युवा आघाडी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने डेरवण हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगांव व जय हनुमान नवतरुण मंडळ कोळकेवाडी कुंभारवाडी यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. कोळकेवाडी कुंभारवाडी येथील हनुमान मंदिरात झालेल्या या शिबिरात १०० हून अधिक लोकांनी लाभ घेतला.
सहभागी रुग्णांची मोफत तपासणी करत औषधोपचार करण्यात आले. सुरवातीला दीपप्रज्वलन व संत गोरोबाकाकांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उद्घाटन कोळकेवाडीच्या सरपंच सुरेखा बोलाडे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात स्त्री रोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, रक्त व लघवी तपासणी, इसीजी आदी तपासण्या तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आल्या. आवश्यकता असलेले मोफत औषधोपचार करण्यात आले. कुंभार समाजाच्या युवा आघाडीच्या माध्यमातून सातत्याने विधायक उपक्रम राबवले जात आहेत. सातत्याने विविध सामाजिक उपक्रम युवा आघाडी राबवत असते. ग्रामीण भागातही लोकांची मोफत वैद्यकीय तपासणी व्हावी, त्यांना दिलासा मिळावा यासाठी कोळकेवाडी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरास तालुकाध्यक्ष प्रकाश साळवी, खजिनदार जनार्दन मालवणकर, किशोर साळवी, पतसंस्था संचालक बबन पडवेकर, सुरेश कोळथरकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रवींद्र शिरकर, नागावे उपसरपंच सुरेश साळवी, युवा आघाडी अध्यक्ष महेश पडवेकर, उपाध्यक्ष नामदेव कुंभार, मंगेश बुरबाडकर, दिनेश वहाळकर, सचिव प्रदीप शिरकर, विनोद सावरटकर, वैभव साळवी, खजिनदार संतोष साळवी आदी उपस्थित होते.