ताणतणाव, नकारात्मक भावना सतारवादनातून दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताणतणाव, नकारात्मक भावना सतारवादनातून दूर
ताणतणाव, नकारात्मक भावना सतारवादनातून दूर

ताणतणाव, नकारात्मक भावना सतारवादनातून दूर

sakal_logo
By

rat१५१९.txt

बातमी क्र.. १९ (टुडे पान २ साठी)

ताणतणाव, नकारात्मक भावना कलेतून दूर

विदुर महाजन ; गोगटे महाविद्यालयात रागा टू रूरल इंडिया उपक्रम

रत्नागिरी, ता. १५ ः ताणतणाव, नकारात्मक भावभावना यांचे मनावरील ओझे उतरवण्याचे काम कोणतीही कला करते, असे प्रतिपादन करून सतार वादनातून विविध विदुर महाजन यांनी रागांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मानवी जीवनातील कलेचे महत्व पटवून दिले. एक तासाहून अधिक काळ चाललेल्या या कलाविष्काराने सर्व उपस्थित श्रोते अतिशय मंत्रमुग्ध झाले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील फिल्म क्लब आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाजन यांचा संवाद आणि सतार वादन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाजन गेली तीसहून अधिक वर्षे सतार वादन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आजवर सतार वादनाचे ८०० हून अधिक कार्यक्रम केले आहेत.
उस्ताद खाँ, उस्ताद शाहीद परवेझ, किशोरीताई आमोणकर यांसारख्या दिग्गज व्यक्तींकडून सांगीतिक शिक्षण घेतलेल्या महाजन यांनी राग-संगीताचा हा वारसा भारतातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून ''रागा टू रूरल इंडिया'' हा उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामीण तसेच निमशहरी भागांत प्रत्यक्ष सतार वादन करून, सतार हे वाद्य, भारतीय राग-संगीत याची ओळख मुख्यत्वे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ते करून देतात. याच उपक्रमाचा भाग म्हणून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात त्यांनी सतारवादन केले. कलेचे मानवी जीवनातील स्थान किती श्रेष्ठ आहे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते. कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्र गोस्वामी , जी. जे. सी. फिल्म क्लबच्या समन्वयक डॉ. निधी पटवर्धन, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, फिल्म क्लबचे सर्व शिक्षक प्रतिनिधी, विविध विभागांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची या कार्यक्रमाला उपस्थित होते.