चिपळूण-चला जाणूया नदीला अभियान प्रभावीपणे राबवावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-चला जाणूया नदीला अभियान प्रभावीपणे राबवावे
चिपळूण-चला जाणूया नदीला अभियान प्रभावीपणे राबवावे

चिपळूण-चला जाणूया नदीला अभियान प्रभावीपणे राबवावे

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl151.jpg -KOP22L68614 चिपळूण - ग्रामसेवकांच्या बैठकीत अभियानाची माहिती देताना शहानवाज शाह.
------------------
‘चला जाणू या नदीला’ अभियान प्रभावी राबवा

आमदार निकम ; चिपळुणातील संयुक्त बैठकीत सूचना
चिपळूण, ता. १५ ः नद्यांतील गाळामुळे त्यांची वहनक्षमता आणि साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करणे अत्यावश्यक बनले आहे. यासाठी राज्य सरकारने ''चला जाणूया नदीला'' हे अभियान राबवले आहे. यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी पंचायत समितीमधील बैठकीत केले.
शासनाच्यावतीने `चला जाणूया नदीला’ हे अभियान राबविण्यात येत असून तालुक्यात ते प्रभावीपणे राबवण्यात यावे. त्यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली. या वेळी या अभियानाचे समन्वयक जलदूत शहानवाज शाह यांनी अभियानाचा हेतू स्पष्ट केला. या अभियानातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचीही माहिती दिली. या अभियानात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेण्याची सूचना आमदार निकम यांनी केली. त्यानंतर तालुक्यातील ग्रामसेवकांच्या बैठकीत समन्वयक शाह यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, या अभियानातून गावातून वाहणाऱ्या नद्यांचा अभ्यास केला जाणार आहे. गावातील जाणत्या लोकांना नद्यांबाबत चांगली माहिती असते. नदीचे चांगले संवर्धन होण्यासाठी व्यापकस्तरावर तिचा अभ्यास व्हायला हवा. हे अभियान व्यापक स्वरूपात असल्याने सामाजिक बांधिलकीतून ग्रामपंचायतींनीही त्यामध्ये योगदान द्यावे.
गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील म्हणाल्या,‘स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून तालुक्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. प्लास्टिकमुक्तीसाठी प्लास्टिक संकलन शेड उभारले जात आहेत. जला जाणूया अभियानात ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. येत्या काही दिवसात सरपंच आणि ग्रामसेवकांची संयुक्त बैठक घेऊन अभियानाची माहिती देण्यात येईल. बैठकीला सरपंचांनी यावे’ .

चौकट
विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण
चला जाणूया अभियानात समन्वयक शहानवाज शाह यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिले आहे. काही महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना यात समाविष्ट करून घेतले आहे. हे विद्यार्थीही त्या-त्या गावातील नद्यांबाबतची माहिती संकलित करणार आहेत.