राजापूर ः विद्यार्थ्यांनी बनवला स्वयंचलित रोबाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः विद्यार्थ्यांनी बनवला स्वयंचलित रोबाट
राजापूर ः विद्यार्थ्यांनी बनवला स्वयंचलित रोबाट

राजापूर ः विद्यार्थ्यांनी बनवला स्वयंचलित रोबाट

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१५p९.jpg ः KOP२२L६८६१३ राजापूर ः इंटरनॅशनल रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक, संस्था पदाधिकारी.
-rat१५p१०.jpg ः KOP२२L६८६०८ विद्यार्थ्यांनी तयार केलेले रोबोट
--------------

विद्यार्थ्यांनी बनवला मदतणीस रोबोट

राजापूर हायस्कूल : कोल्हापुरमधील स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय मदत असो वा अन्य कोणत्याही प्रकारची मदत वा साहाय्य करायचे असेल तर इच्छा असूनही एकमेकांना मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशी स्थिती परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण झाल्यास लोकांना मदत करण्यास उपयुक्त ठरणारा रोबोट शहरातील राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजापूर हायस्कूलच्या अटल टिंकरिंग लॅबच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. स्वयंचलित असलेले हे रोबोट वजन उचलण्यासह एखाद्या रुग्णाला औषधे देण्यासह अन्य प्रकारची मदत करण्यास साहाय्यभूत ठरणारे आहेत.
राजापूर हायस्कूलच्या मोठ्या गटातील स्वानंदी शिवलकर, शर्वरी नवरे, सिधाई शिंदे, स्वरा पाटणकर या विद्यार्थ्यांनी सुमारे ८ दिवसांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग करून हा रोबोट तयार केला आहे. या रोबोटने कोल्हापूर येथे झालेल्या इंटरनॅशनल रोबोटिक्स या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याच्या जोरावर त्याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातील १०० पेक्षा अधिक संघांमधील पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये राजापूर हायस्कूल राजापूरच्या अटल टिंकरिंग लॅबमधील विद्यार्थ्यांनी लहान गटात (पाचवी ते आठवी) तीन संघांनी व मोठ्या गटात (नववी ते बारावी) दोन संघानी सहभाग घेतला होता. एकूण ५ संघातून हायस्कूलचे १७ विद्यार्थी सहभागी झाले होते.

असा बनवला रोबोट
राजापूर हायस्कूलच्या मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी सेन्सर, कलर सेन्सर, व्हिल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या प्लेटस, छोटे नटबोल्ट, गिअर सिस्टीम, मोटार, ब्रेन, लॅपटॉप, प्रोगॅमिंग लॅग्वेज यांचा उपयोग करत स्वयंचलित रोबोट तयार केला होता. या विद्यार्थ्यांना अटल लॅबचे इनचार्ज अभिजित घागरे, भारत जानकर, गौरी अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर दत्तप्रसाद सिनकर, नितीन सोनवणे, उमाशंकर दाते, प्रवीण बाणे, वैभव करंबे, प्रवीण बाणे, सुजित पारकर, सिद्धेश पारकर, विद्यार्थी मनीष सुर्वे यांचे सहकार्य लाभले.