रत्नागिरी ः 792 अंगणवाडींना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः 792 अंगणवाडींना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा
रत्नागिरी ः 792 अंगणवाडींना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा

रत्नागिरी ः 792 अंगणवाडींना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat१५p८.jpg- KOP22L68612 सौर ऊर्जा पॅनेल
-----
सौर ऊर्जेद्वारे ७९२ अंगणवाड्यांना वीज
१५ कोटींचा प्रस्ताव ; जिल्हा नियोजनकडून मिळणार निधी
रत्नागिरी, ता.१५ ः अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रत्येक अंगणवाडीत उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद कृषी विभागाकडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक प्रकल्प दीड वॅटचा आहे. जिल्ह्यातील ७९२ अंगणवाडी इमारतींवर सौरपॅनल उभारली जाणार असून त्यासाठी १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला आहे.
जिल्ह्यात अनेकवेळा वेळेत विजबिले न भरल्यामुळे जिल्हा परिषद इमारतींचा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्याचा परिणाम नियमित व्यवहारांवर होत असल्यामुळे शासनाने सोलर मिशन कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी इमारतींसह प्राथमिक शाळांनाही सौर पॅनेलद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या इमारतींना सौर पॅनेलद्वारे वीजपुरवठा करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. पुढील टप्प्यात ग्रामपंचायत कार्यालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी गोळप येथे एक मेगावॅटचा प्रकल्प २०२२-२३ या आर्थिक वर्षात उभारण्यात येणार आहे. तिसर्‍या टप्प्यात अंगणवाडी इमारतींवर सौरपॅनेल बसवण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद कृषी विभागाकडून पाठवण्यात आला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनमधून १५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. अंगणवाडींना सरासरी महिन्याला ४०० रुपये वीजबिल येते. जिल्ह्यातील ७९२ अंगणवाडी इमारतींना वीज पुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. यामुळे वर्षाचे सुमारे ३६ लाख रुपयांच्या वीजबिलाची बचत होणार असून विजेचा पुरवठा बिल न भरल्यामुळे खंडित करण्याचा प्रश्‍नच उद्भवणार नाही. एका अंगणवाडीसाठी दीड वॅट विजेची निर्मिती होईल अशी पॅनेल बसवण्यात येणार आहेत. तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडला पुरवली जातील. त्या विजेच्या बदल्यात बिलाची रक्कम वजा करून घेतली जाईल. पावसाळ्यात ढगाळ वातावरण असले तरीही हा पुरवठा खंडित होणार नाही, अशी अत्याधुनिक बनावटीची सौरपॅनेल बसवली जाणार आहेत.

चौकट
तालुका अंगणवाडी
* मंडणगड*६३
* दापोली*९९
* खेड*६८
* गुहागर*५७
* चिपळूण*१०३
* संगमेश्‍वर*१५५
* रत्नागिरी*४८
* राजापूर*९०
* लांजा*१०९

कोट
शासकीय इमारतींना अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती हाती घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात दरवर्षी नियोजनच्या निधीतून तरतूद केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेडून प्रस्ताव पाठवण्यात येत आहेत.
- अजय शेंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी