पेंडूर येथे 30 पासून विविध धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेंडूर येथे 30 पासून विविध धार्मिक कार्यक्रम
पेंडूर येथे 30 पासून विविध धार्मिक कार्यक्रम

पेंडूर येथे 30 पासून विविध धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

swt१५९.jpg
६८६६१
श्री देव वेताळ

पेंडूर येथे ३० पासून
विविध धार्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा व दर तीन वर्षांनी होणारा तालुक्यातील पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिरातील त्रैवार्षिक मांड उत्सव ३० डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यानिमित्त ३० डिसेंबर ते ११ जानेवारीपर्यंत रोज रात्री ९ वाजता भजनाचा कार्यक्रम, १०.३० वाजता दिंडी सोहळा होणार आहे. १ जानेवारीला दुपारी ३ वाजल्यापासून ओटी भरणे, ८ ला सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत लक्ष्मीनारायण ढोल पथक, वालावल यांचे ढोल वादन होणार आहे. ९ ला प्रसिद्ध रांगोळीकार समीर चांदरकर व त्यांचे सहकारी यांचे रांगोळी प्रदर्शन आयोजित केले आहे. रात्री ९.३० वाजता दीपोत्सव सोहळा व फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. १० ला रात्री ८ ते ९.३० या वेळेत न्यू इंग्लिश स्कुल पेंडूरच्या विद्यार्थ्यांची योगासने प्रात्यक्षिके, ११ ला दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७.३० वाजता श्री गणेश माऊली पाताळेश्वर ढोल पथक, चेंदवण यांचे वादन, रात्री देवीचा गोंधळ होणार आहे.
हा मांड उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असून मुंबईसह अन्य ठिकाणाहून भाविक यासाठी उपस्थित राहतात. मांड उत्सवात भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळ व बारापाच मानकरी, पेंडूर यांनी केले आहे.