भात खरेदी संदर्भातील अटी शिथिल कराव्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात खरेदी संदर्भातील अटी शिथिल कराव्यात
भात खरेदी संदर्भातील अटी शिथिल कराव्यात

भात खरेदी संदर्भातील अटी शिथिल कराव्यात

sakal_logo
By

swt१५११.jpg
६८६५७
मडुरा : भात खरेदीचा प्रारंभ करताना चेअरमन संतोष परब. सोबत प्रकाश गावडे, अशोक कुबल, प्रकाश सातार्डेकर, प्रकाश जाधव, सोमनाथ परब आदी.

भात खरेदीच्या अटी शिथिल कराव्यात
संतोष परब यांची शासनाकडे मागणी; मडुऱ्यात खरेदीचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः भात विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना पावती व कागदपत्रे सावंतवाडी येथे नेण्यासाठी पदरमोड करून अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शासनाने यासंदर्भातील अट शिथिल करून पूर्वीप्रमाणे केंद्रातच सर्व कार्यवाही करावी, अशी मागणी मडुरा सोसायटी चेअरमन संतोष परब यांनी शासनाकडे केली आहे.
राज्याच्या खरीप पणन हंगाम २०२१-२२ आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत मडुरा सोसायटी येथे भात खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. सोसायटी चेअरमन परब यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संचालक अशोक कुबल, प्रकाश गावडे, आत्माराम गावडे, प्रकाश सातार्डेकर, सुनंदा परब, गटसचिव सुभाष राऊळ, वरिष्ठ लिपिक प्रकाश जाधव, सेल्समन सोमनाथ परब, श्रेया परब आदी उपस्थित होते. शासनाने भात खरेदी करताना ज्या जाचक अटी ठेवलेल्या आहेत, त्या शिथिल कराव्यात. तसेच शेतकऱ्यांना मिळणारा बोनस पुन्हा सुरु करावा, अशी मागणी संचालक प्रकाश गावडे यांनी केली. तर खरीप पणन हंगाम आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत राज्याने भात खरेदीसाठी प्रति क्विंटल २०४० रुपये दर निश्चित केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन भात नोंदणी केली आहे, त्यांनी भात नोंदणी केलेला सातबारा घेऊन भात विक्रीसाठी आणावे, असे आवाहन चेअरमन परब यांनी केले आहे.