रवींद्रकुमार चव्हाण सहाय्यक अधीक्षकपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवींद्रकुमार चव्हाण सहाय्यक अधीक्षकपदी
रवींद्रकुमार चव्हाण सहाय्यक अधीक्षकपदी

रवींद्रकुमार चव्हाण सहाय्यक अधीक्षकपदी

sakal_logo
By

swt1512.jpg
68658
रवींद्रकुमार चव्हाण

रवींद्रकुमार चव्हाण सहाय्यक अधीक्षकपदी
ओरोसः जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिकपदी कार्यरत असलेले रवींद्रकुमार चव्हाण यांची विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे सहाय्यक अधीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. चव्हाण यांनी जिल्हा माहिती कार्यालयात अल्पावधीत आस्थापना, लेखा, जाहिरात व न्यूज यासारख्या प्रशासकीय कामाचा ठसा उमटवत ही भरारी घेतली आहे. यासाठी त्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन तसेच आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा, नातलग यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. या पदोन्नतीबद्दल चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
...............
swt1514.jpg
68665
बांदाः गोठण येथे श्री गवळदेव उत्सवास जमलेले ग्रामस्थ.

बांदा येथे गवळदेव उत्सव
बांदाः बांदा गोठण येथे प्रतिवर्षीप्रमाणे पारंपरिक श्री गवळदेव उत्सव उत्साहात पार पडला. बांदा गवळीटेंब, निमजगा व शेटकरवाडी येथील ग्रामस्थ एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात. यानिमित्त श्री गवळदेवाची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर नैवेद्य व आरती होऊन महाप्रसादाला आरंभ झाला. सर्वांच्या रक्षण व कल्याणासाठी श्री गवळदेवाला  साकडे घातल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. पूर्वापार ही प्रथा सुरु असून त्याकाळी परिसरातले गुराखी आपल्या गुरांना चरायला व पाण्यासाठी सोडत. एकत्र जमून शिदोरी खात. त्यावेळी त्यांचे व गोधनचे रक्षण करणारी देवता असलेल्या गवळदेवाला वंदन करत. गवळदेवाचे पूजन व एकत्रित वनभोजनाची प्रथा अद्याप सुरु ठेवली आहे, असे अविनाश सावंत, शरद सावंत यांनी सांगितले. यावेळी तिन्ही वाड्यांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.................