मठ वनपाल सावळा कांबळे यांना रजत पदक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मठ वनपाल सावळा कांबळे यांना रजत पदक जाहीर
मठ वनपाल सावळा कांबळे यांना रजत पदक जाहीर

मठ वनपाल सावळा कांबळे यांना रजत पदक जाहीर

sakal_logo
By

swt१५१९.jpg
६८६९८
सावळा कांबळे

मठ वनपाल सावळा कांबळे
यांना रजत पदक जाहीर
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ः वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याकरीता व त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहीत करण्याकरीता तालुक्यातील मठ वनपाल सावळा कांबळे यांना ‘रजत पदक‘ जाहीर झाले आहे. लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री. कांबळे यांनी जानेवारी २००८ ते जानेवारी २०१७ या कालावधीत माणगाव खोऱ्यात केरवडे, चाफेली, कालेली व वाडोस या अतिसंवेदनशील बिटवर काम करत वन्य हत्तींच्या बंदोबस्तामध्ये काम केले आहे. नोव्हेंबर २००८ ते फेब्रुवारी २००९ च्या हत्ती पकड मोहिमेत विशेष नेमणूक झाल्यावर एकूण ३ हत्ती पकडले होते. वनरक्षक वाडोस पदावर काम करताना त्यांनी वनातील अवैध वृक्षतोड व अवैध वाहतुकप्रकरणी ११ आरोपीपकडून त्यांच्यावर वन गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली होती. तेर्सेबांबर्डे येथील फर्निचर मार्ट येथे माणगांव वनक्षेत्रातील पुण्यातील फरार लाकूड मालाची तपासणी करुन ६ हजार ७२५ रुपये इतका माल जप्त केला. अशा अनेक विविध कामांची शासनस्तरावर दखल घेत शासनाने कांबळे यांना रजत पदक जाहीर केले आहे.
----------------