
आमच्या भानगडीत पडू नका
swt1513.jpg
68659
परशुराम उपरकर
आमच्या भानगडीत पडू नका
मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे आमदार राणेंना प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ः आमदार नितेश राणे यांनी मला सल्ले देण्याची गरज नाही. तुमच्या वडिलांना आम्ही सल्ले दिले होते. त्यांना खाजगी विचारा. तुम्ही ज्या ज्या पक्षात होतात, त्या त्या वेळी तुमच्या भूमिका बदलेल्या आहेत. आम्ही बाहेर काढायला सुरुवात केली तर तुम्हाला अवघड होईल. आमच्या भानगडीत तुम्ही पडू नका, अशी प्रत्युत्तर मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिले.
आमदार राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये श्री. उपरकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी उपरकर यांनी आज येथील मनसेच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘नांदगाव येथील एका बैठकीमध्ये राणे यांनी जनतेला धमकावण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराबाबत जनतेने एकत्र येऊन लढाई करण्याची गरज असल्याने मत आम्ही उपस्थित केले होते. त्यावर राणे यांनी आम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न केला. मुळात आमदार असताना त्यांनी समानतेने वागण्यातबाबत शपथ घेतली होती. जनतेवर अन्याय होणार नाही, असे यात म्हटले होते. त्याचा विसर कदाचित राणेंना पडला असेल. त्यांचे वडील १९९० पासून निवडणुकीत उतरले, तेव्हा राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतरही अनेकदा काँग्रेसची सत्ता होती. सत्ता नसताना राणेंनी विकास केला, असे तुम्ही सांगत होता. विरोधी पक्षात असताना विकास केला, असेही सांगत होता. मग आता सत्ता असल्याने ग्रामीण विकास आम्हीच करणार असे सांगत फिरत आहात. तुम्ही आमदार होता, तेव्हाही विरोधी पक्षात होता. मग विकास झाला, असे तुम्हीच सांगता होता.’’
कोट
‘‘राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न राणे करत आहेत; मात्र, मनसेचे कार्यकर्ते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत. माझ्या पदाची राणे यांनी काळजी करू नये. राज ठाकरे यांना भेटून तुम्ही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही भिक घालणार नाही. राज ठाकरेंना भेटून आपण जवळचे आहोत असे भासवण्याचाही प्रयत्न करू नका.’’
- परशुराम उपरकर