दापोली मतदार संघात राजकीय पक्षांचा सावध पवित्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोली मतदार संघात राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
दापोली मतदार संघात राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

दापोली मतदार संघात राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

sakal_logo
By

rat१५२१.txt

(पान २ साठी)

रणधुमाळी--लोगो

दापोली मतदारसंघात राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

खेड तालुक्यातील विभाग ; निकालानंतरच वर्चस्वांची घोषणा
सकाळ वृत्तसेवा ः
खेड, ता. १५ ः खेड तालुका हा दापोली आणि गुहागर या दोन मतदार संघात विभागला गेलेला आहे. त्यामुळे येणाऱ्‍या प्रत्येक निवडणुकीत या तालुक्यात काहीतरी वेगळेच राजकीय समीकरण पाहायला मिळत असते. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत खऱ्‍या अर्थाने या तालुक्याने आपले वेगळे स्वरूप सिद्ध केले आहे. या वेळी एकूण १० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून, त्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आठ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.
दापोली विधानसभा मतदार संघात येणाऱ्‍या कळंबणी, चिंचवली आणि तिसंगी या तीन ग्रामपंचायतीसाठी या वेळी निवडणूक होत आहे. चिंचवली ग्रामपंचायतीत सदस्य बिनविरोध देण्यात आले असून, या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठीच निवडणूक होत आहे. महामार्गालगत असलेल्या आणि गेल्या दहा-बारा वर्षांत अधिक महत्व प्राप्त झालेल्या कळंबणी ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा चांगलाच धुरळा उडत आहे. या निवडणुकीत दोन पॅनेल उभे आहेत. दापोली मतदार संघात राजकीय पक्षांचा पाठिंबा जाहीर द्यासाठी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्‍यांनी सावध पवित्रा घेतलेला दिसून येतो. निकालानंतरच राजकीय पक्ष वर्चस्वाची घोषणा करतील, असा अंदाज येत आहे.