उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वाडीवस्तीवर बैठका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वाडीवस्तीवर बैठका
उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वाडीवस्तीवर बैठका

उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वाडीवस्तीवर बैठका

sakal_logo
By

rat१५२४.TXT

(पान २ साठीमेन)

रणधुमाळी--लोगो

उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वाडीवस्तीवर बैठका

आव्हान निर्माण करण्यात यश ; माजी सदस्य आघाडीवर
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १५ ः तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका निकालात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे वर्चस्व राखण्यासाठी वाडीवस्तीवर प्रचाराच्या बैठका घेण्यावर भर दिला जात आहे. स्थानिक पदाधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषद माजी सदस्यांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबवली जात आहे.
राज्यात शिवसेनेचे दोन पक्ष झाल्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे आमदार उदय सामंत शिंदे गटात गेले. त्यानंतर राज्यात सत्ता आल्यानंतर सामंत पालकमंत्री झाले. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात ठाकरे सेनेविरुद्ध शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही पक्षांकडून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रचार यंत्रणा राबविण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला भाजपची जोड मिळाल्यामुळे प्रचारात मोठी मदत होत आहे. शिंदे गट अस्तित्वात आला असला तरीही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच राहिले आहेत. २९ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचांसाठी ६४ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच सदस्यांसाठी सव्वातीनशे उमेदवार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कॉर्नर सभांपेक्षाही वाडीवस्तीवर बैठका घेण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन केले जात आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटातील माजी सदस्यांसह विभागाप्रमुख, शाखाप्रमुखांची मदत घेण्यात येत आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास पॅनलला पाठिंबा देण्यात आला आहे. काही ठिकाणी घरोघरी प्रचारही सुरू आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षासमोर तगडे आव्हान निर्माण करण्यात ठाकरे सेनेला यश आले आहे.
---
कोट
तालुक्यातील नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून नियोजन सुरू आहे. निकालानंतर पक्षाला मिळालेले यश सर्वांना दिसून येईल.
- बंड्या साळवी, तालुकाप्रमुख