रत्नागिरी- रिफायनरीची अधिसूचना प्राधान्याने काढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- रिफायनरीची अधिसूचना प्राधान्याने काढा
रत्नागिरी- रिफायनरीची अधिसूचना प्राधान्याने काढा

रत्नागिरी- रिफायनरीची अधिसूचना प्राधान्याने काढा

sakal_logo
By

रिफायनरीची अधिसूचना प्राधान्याने काढा
अॅड. विलास पाटणे ; मासे कोकणात, मत्स्य विद्यापीठ नागपूरला
रत्नागिरी, ता. १५ ः कोकणातील हजारो युवक नोकरीसाठी स्थलांतरित होत आहेत. अशावेळी दोन लाख कोटी गुंतवणुकीचा १.५ लाख रोजगार निर्मितीची रिफायनरी कोकणच्या भविष्याची वाट आहे. यास्तव रिफायनरीची अधिसूचना प्राधान्याने काढण्याची गरज कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (ता. १६) येत आहेत. या निमित्ताने आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अॅड. पाटणे म्हणाले, ‘ओरिसाच्या धर्तीवर स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट सुरू केल्यास प्रगत तंत्रकौशल्य प्राप्त होऊन रोजगार मिळेल. रिफायनरीला कोयनेचे पाणी देताना कोकणातील वाटेतील गावातील गरीबांची तहान भागवण्याची गरज आहे. कोकणात पर्यटनाला प्रचंड संधी असूनही प्रभावी मार्केटिंगअभावी अपेक्षित गती मिळत नाही. केरळमध्ये अल्लेपीत २३०० हाऊस बोटीवर २५ हजार तरुणांना रोजगार आणि ८ हजार ७६४ कोटींचे परकीय चलन मिळते. आपण छोट्या जेटी बांधून हाऊस बोटीकरिता तरुणांना अर्थसाहाय्य केले तर प्रचंड रोजगार उपलब्ध होईल.

यासाठी आग्रह हवा
७२ टक्के मत्स्योत्पादन कोकण किनारपट्टीवर होत असताना मासे कोकणात मात्र मत्स्यविद्यापीठ नागपूरला हे अनाकलनीय आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये स्वतंत्ररित्या मत्स्यविद्यापीठ किनारपट्टीवर होतात आणि आम्ही नागपूरमधील मत्स्यविद्यापीठ कोकणच्या किनारपट्टीवर उभारत नाही, अशी खंत अॅड. पाटणे यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कोकणात मेरीटाईम क्षेत्रात मरीन इंजिनियरिंग, आर्किटेक्चर, लॉ, शिप बिल्डिंग आदींचे शिक्षण देणारी व्यवस्था तसेच मुंबई विद्यपीठाच्या उपकेंद्रात रेल्वेला लागणाऱ्या तंत्रशिक्षण मिळाले पाहिजे. पालकमंत्री यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी कोकणासाठी आग्रही राहतील काय, असेही अॅड. पाटणे म्हणाले.