रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

रत्नागिरीत आज गीत परशुराम कार्यक्रम
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने भगवान श्री परशुरामाच्या जीवन चरित्रावर आधारित गीत परशुराम हा सुश्राव्य कार्यक्रम उद्या (ता. १६) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेले दत्तमाहात्म्य, रामायण आणि महाभारत यातील परशुरामांच्या कथेवर आधारित नवीन गीते या कार्यक्रमामध्ये आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि गीत लेखन, निवेदन वैभव दातार (मुंबई) यांचे आहे. संगीतकार, गायक आणि हार्मोनियम साथ मिलिंद करमरकर आहेत. स्वरजा करमरकर सहगायन करणार आहेत. त्यांना राजेंद्र दातार आणि नीरज लेले तबलासाथ करणार आहेत.
--------------

मूर्ती ट्रस्टतर्फे साडेसात कोटी रुपयांची देणगी
रत्नागिरी ः संस्कृतला चांगले दिवस येत आहेत. याच अनुषंगाने सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या मूर्ती ट्रस्टने पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला साडेसात कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. संस्कृत आणि प्राकृत भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे जतन, संशोधन करण्यासाठी याचा विनियोग केला जाणार आहे. रत्नागिरीतील जिज्ञासू, अभ्यासू व्यक्तीसुद्धा या संस्थेत काम करत आहेत. अनुदानातून १८ हजार चौरस फूट हेरिटेज शैलीची शैक्षणिक आणि संशोधन इमारत, अत्याधुनिक सभागृह आणि प्राचीन पुस्तके आणि हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी दृकश्राव्य स्टुडिओचे बांधकाम केले जाणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
-------------------
फोटो ओळी
-rat१५p२७.jpg- KOP२२L६८६५२ डॉ. राधिका केळकर
------------
डॉ. केळकर यांचे एमडी पदवी परीक्षेत यश
रत्नागिरी : येथील डॉ. सौ. राधिका देशपांडे- केळकर यांनी एमडी आयुर्वेद पंचकर्म पदवी परीक्षेत यश मिळवले. त्यांनी बीएएमएसचे शिक्षण वाघोली, पुणे येथे पूर्ण केले. त्यानंतर बेंगलोर, कर्नाटक येथील आरजीएचएस युनिव्हर्सिटीमध्ये एमडी पंचकर्म पदव्युत्तर पदवी संपादन केली. सध्या डॉ. केळकर मारुती मंदिर येथील वीर सावरकर नाट्यगृहाजवळ साईनिकेतन क्लिनिकमध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत.
---------------

रत्नागिरीत १९ ला नाभिक समाजाची सभा

रत्नागिरी ः नाभिक समाज हितवर्धक मंडळाच्या रत्नागिरी तालुका शाखेच्यावतीने १९ डिसेंबरला सकाळी ११ वा. पऱ्याची आळी येथील गुरूकृपा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. या सभेसाठी तालुक्यातील सर्व नाभिक समाजबांधव, मंडळाचे सभासद, पदाधिकारी, ग्रामीण व शहरी विभागप्रमुख आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बावा चव्हाण यांनी केले आहे.
-------------------

फोटो ओळी
-rat१५p१६.jpg- KOP२२L६८६२१सावनी रवींद्र
----------
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवात
गायिका सावनी करणार गायनसेवा

पावस ः तरुण पिढीतील युथ आयकॉन म्हणून ओळखली जाणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र ही स्वामी स्वरूपानंद जयंतीनिमित्त पावस येथे गायनसेवा सादर करणार आहे. घन अमृताचा हा भक्तीगीतांचा विशेष कार्यक्रम ती सादर करेल. रत्नागिरी हे सावनीचे आजोळ आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तीनंतर ती प्रथमच रत्नागिरीत येत आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, कोकणीसारख्या अनेक भारतीय भाषांमध्ये सावनीची गाणी लोकप्रिय आहेत. भारतरत्न लता मंगेशकर, भावगंधर्व पं. हृदयनाथजी मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांचे तिला नेहमीच आशीर्वाद लाभले आहेत. मराठीतील सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून गेल्या वर्षी ६७व्या राष्ट्रीय पुरस्काराने तिला गौरवण्यात आले. स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवात सावनीचा कार्यक्रम २० डिसेंबरला रात्री ९.३० वा. होणार आहे. या कार्यक्रमात संतवाङ्ममय व अनेक लोकप्रिय भक्तीगीतांचा समावेश आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या १२०व्या जन्मतिथी उत्सवाचे औचित्य साधून स्वामी स्वरूपानंदाचा एक अभंग सावनी रवींद्र आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत आहे. या कार्यक्रमात त्या अभंगाचाही समावेश आहे. सुरेल नामवंत वाद्यवृंदासह सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे निरूपण सुप्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका दीप्ती भागवत या करणार आहेत. सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा अवश्य आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केले आहे.
---------
फोटो ओळी
-rat१५p११.jpg ः KOP२२L६८६०९ गावतळे ः विस्तार अधिकारी नांदगावकर हे धनश्री हिचे अभिनंदन करताना.
---------------
घरी जाऊन केले विद्यार्थिनीचे कौतुक
गावतळे ः इस्रो नासा भेटीसाठी उत्सुक असलेल्या जिल्हा परिषद शाळा शिरसोली क्र. १ शाळेच्या धनश्री जाधव हिच्या घरी पालगड प्रभाग शिक्षणविस्तार अधिकारी सुनील सावंत यांनी १३ जुलैला भेट देऊन धनश्री हिच्यासह पालक आणि शिक्षक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मुख्याध्यापक मजीद नांदगावकर यांनी पाठीवर शाबासकीची थाप देणारे अधिकारी असतील तर काम करायला हुरूप येते, असे सांगत साहेब अपण फक्त लढ म्हणा आम्ही सदैव तत्पर आहोत, असे मनोगत व्यक्त केले तर पदवीधर शिक्षक संदीप भेकत यांनी हा व्हिजन दापोली इफेक्ट असल्याचे सांगत व्हिजनमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल्याचेही मत व्यक्त केले. या वेळी टांगर शाळेचे मुख्याध्यापक विवेकानंद कालेकर, सांगडे, धनश्रीची आजी आणि गावच्या उपसरपंच राजेश्री जाधव उपस्थित होत्या. २०डिसेंबरला होणार्‍या अंतिम चाचणीसाठी सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.