चिपळुणात कार दुचाकीचा भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात कार दुचाकीचा भीषण अपघात
चिपळुणात कार दुचाकीचा भीषण अपघात

चिपळुणात कार दुचाकीचा भीषण अपघात

sakal_logo
By

rat1527.txt

(पान 3 साठी)

फोटो ओळी
- ratchl157.jpg ः
68716
चिपळूण ः अपघातानंतर चारचाकीचा झालेली चक्काचूर.
-ratchl158.jpg ः
68717
अपघातात दुचाकीची झालेली स्थिती
---
चिपळुणात मोटार-दुचाकीचा भीषण अपघात

उक्ताड पुलावरील घटना ; दुचाकीस्वार गंभीर जखमी
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. 15 ः शहरातील उक्ताड पुलावर बुधवारी (ता. 14) रात्री मोटार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. मोटारीचेही मोठे नुकसान झाले आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. जखमीला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथे पाठवण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोवळकोट येथील अमजद घारे (45) हे आपल्या दुचाकीवरून रात्री गोवळकोटच्या दिशेने निघाले होते. उक्ताड येथील पुलावर ते आले असता समोरून मोटारीचा आणि त्याच्या दुचाकीची धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, अमजद घारे हे कित्येक फूट लांब फेकले गेले. त्यांच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला तर मोटारीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. सफन परकार (रा. गोवळकोट रोड) हे मोटार चालवत होते. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमजद घारे यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.