राजापूर ःजमिनीचे बक्षिसपत्र करण्यातील अडथळे करणार दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःजमिनीचे बक्षिसपत्र करण्यातील अडथळे करणार दूर
राजापूर ःजमिनीचे बक्षिसपत्र करण्यातील अडथळे करणार दूर

राजापूर ःजमिनीचे बक्षिसपत्र करण्यातील अडथळे करणार दूर

sakal_logo
By

फोटो ओळी
KOP22L68645
-rat15p20.jpg ः पाणीटंचाई आढावा बैठकीमध्ये बोलताना आमदार राजन साळवी. शेजारी तहसीलदार शीतल जाधव, प्रभारी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, खोत आदी.
---------------
जमिनीच्या बक्षिसपत्रातील अडथळे करणार दूर
तहसीलदार जाधव, जलजीवन मिशनबाबत आमदार साळवींच्या उपस्थितीत बैठक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 15 ः जलजीवन मिशन योजनेमध्ये प्रस्तावित असलेल्या नळपाणी योजनांना मंजुरी देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने पूर्तता करावी. ज्यांची कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. त्या नळपाणी योजनांना मंजुरी देऊन प्रशासनाने पुढील अंमलबजावणी करावी, अशी सूचना आमदार राजन साळवी यांनी संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठकीच्यावेळी केली.
या वेळी झालेल्या चर्चेच्यावेळी तहसीलदार जाधव यांनी जमिनीचे बक्षीसपत्र करण्यामध्ये येणारे अडथळे कसे दूर कसे करता येतील या संबंधित सविस्तर माहिती दिली.
ज्या गावांना विंधन विहिरींची आवश्यकता आहे, त्यांनी येत्या काही दिवसांमध्ये विंधन विहिरींच्या प्रस्तावासह पाणीटंचाई दूर करण्याच्या अनुषंगाने अन्य कामांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यास त्यांनी सांगितले. एप्रिल-मे महिन्यामध्ये भेडसावणार्‍या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यासाठी आज आमदार साळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.ज्या जागेमध्ये पाण्याची साठवण टाकी वा अन्य नळपाणी योजनेसंबंधित काम करावयाचे असेल तर त्या जागेचे बक्षीसपत्र असणे गरजेचे आहे. मात्र, सातबारा उतार्‍यावर अनेक हिस्सेदारांची नावे असल्याने बक्षीसपत्र होताना अडथळे येत असल्याची माहिती सरपंच आणि ग्रामसेवकांनी या वेळी सभागृहामध्ये दिली.

चौकट
अद्यापही पाणीपुरवठा होत नाही
शहरानजीकच्या कोंढेतड गावामध्ये लाखो रुपये खर्चून नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. मात्र, लोकांना अद्यापही पाणीपुरवठा होत नसल्याकडे कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी आमदार राजन साळवी यांच्यासह प्रशासनाचे लक्ष वेधले. गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि ठेकेदार यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी करून पुढील योग्य त्या उपाययोजना करण्याचे या वेळी निश्‍चित करण्यात आले.