
लेख ः सर्वसामान्यांचे आधारवड
फोटो ओळी
-rat१५p३३.jpg -KOP२२L६८७४१ वसंतराव नवाळे
----------
इंट्रो
राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे गावचे सुपुत्र (कै.) वसंतराव नवाळे यांनी दिशादर्शक अन् धडाडीच्या नेतृत्वाने देवाचे गोठणे गावासह राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे राजापूरचे माजी व्यवस्थापक म्हणून त्यांनी सहकाऱ्यांच्या साथीने राजापूर नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहकार रूजवण्याचे प्रयत्न केले. अनेकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. कुणबी समाजबांधवांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही हिरीरिने पुढाकार घेतला. असे अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या वसंतराव नवाळे यांचा शुक्रवारी (ता. १६) चौदावा स्मृतीदिन. त्या निमित्ताने ---------
सर्वसामान्यांचे आधारवड ःवसंतराव नवाळे
१६ डिसेंबर २००८ चा तो भयाण दिवस आठवला की, आजही काळजात धस्स होतं. उभी हयात ज्यांनी दुसऱ्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद फुलवण्यासाठी घालवली, स्वतःच्या घरादारावर जणू तुळशीपत्र ठेवून ज्यांनी समाजासाठी आयुष्य वेचलं, धर्म-जातपात, आपला-परका, कुठली संघटना, कोणता पक्ष असा कोणताही भेदभाव न ठेवता फक्त माणुसकी पाहिली ते अचानक आम्हाला पोरके करून निघून गेले. आपल्याला मिळालेल्या आयुष्यात माणसे जोडली. आपल्या परखड वक्तृत्वाने समाजाला भुरळ पाडली. त्यांच्या अंगी वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व यांचा सुरेख संगम होता. त्यामुळे त्यांचे वक्तृत्व ऐकण्यासाठी अनेकजण आतूर असत. ते बोलायला लागले की, ऐकणाऱ्यांच्या हृदयात केव्हा शिरायचे हे कुणालाच कळायचे नाही. आपल्या समाजातील माणसांसाठी जगण्याची त्यांची तळमळ आजही एक वेगळी उमेद, उभारी देऊन जाते. त्यांचे विचार आठवले की, आजही एक नवीन उर्मी, जोश अंगात संचारतो. असा मी पाहिलेला माणसातला देव म्हणजेच माझे प्रेरणास्थान, आशास्थान आणि दैवत म्हणजेच आदर्श जीवन जगणारा व समाजाला आदर्श देणारं व्यक्तीमत्व म्हणजेच(कै.) वसंतराव नवाळे.
(कै.) वसंतरात म्हणजे आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातलं एक तुफानी वादळ होतं. आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा अन् ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा होती. अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणारा तो महान शिल्पकार होता. कधी पाठीवरील शाबासकीचा हात होता, कधी कौतुकाचे गोड शब्द होते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार होता. (कै.) वसंतराव यांनी समाजातल्या कित्येक चिमुकल्या पाखरांच्या पंखाना बळ निर्माण केलं आणि संस्काराची शिदोरी दिली. त्या सामर्थ्यावर कित्येकांनी यशाच्या शिखराला गवसणी घातली. माझ्यासह समाजातील कित्येकांच्या जीवनात देवदूत बनून धावलेले (कै.) वसंतराव नवाळे आजही आम्हाला देवापेक्षाही महान वाटतात. या माणसातल्या देवामुळेच तर आम्ही त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन मार्गक्रमण करत आहोत. माझ्यासह शेकडो बांधवांच्या मनात आजही (कै.) वसंतराव घर करून आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
आज या देवमाणसाचा १४ वा स्मृतिदिन. त्यांची आठवण म्हणून त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्णत्वास जाण्यास सर्वांनी प्रयत्न करणे म्हणजेच त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासारखे होईल. त्यांची प्रेरणा व आठवण एक वेगळ चैतन्य, वेगळी ऊर्जा निर्माण करते. अशा माणसातल्या या देवाला विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली!
आपण असे अकाली निघून जाणं
असे नव्हते कुणाच्या ध्यानीमनी
आपल्या जाण्यानंतरही सदैव
उरतील आपल्या आठवणी.
-
--धोंडू वासुदेव नवाळे (गुरूजी), मु. केरावळे, देवाचे गोठणे, राजापूर