प्रसाद कुलकर्णी यांचाही शासनच्या निषेधार्थ राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रसाद कुलकर्णी यांचाही 
शासनच्या निषेधार्थ राजीनामा
प्रसाद कुलकर्णी यांचाही शासनच्या निषेधार्थ राजीनामा

प्रसाद कुलकर्णी यांचाही शासनच्या निषेधार्थ राजीनामा

sakal_logo
By

68753 - प्रसाद कुलकर्णी

प्रसाद कुलकर्णी यांचाही
शासनच्या निषेधार्थ राजीनामा
''फ्रॅक्चर्ड फ्रीडम''च्या वादळाचे पडसाद कायम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः ''फ्रॅक्चर्ड फ्रीडम'' या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला राज्य पुरस्कार शासनाने अध्यादेश काढून रद्द केल्याने राज्याच्या साहित्यिक वर्तुळात उठलेले वादळ कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज ज्येष्ठ साहित्यिक तथा सिंधुदुर्गातील मूळ रहिवासी प्रसाद कुलकर्णी यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या शासन नियुक्त सदस्यपदाचा राजीनामा दिला.
त्यांनी मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिवांना राजीनामा पत्र सादर केले आहे. त्यात म्हटले आहे, की राज्याने पुरस्कार रद्द केल्याच्या निर्णयाबाबत मंडळाचा सदस्य या नात्याने या संदर्भात सखोल माहिती करून घेणे मला आवश्यक वाटले. गेले दोन दिवस माझ्या आनंदयात्रेच्या निमित्ताने विदर्भ दौऱ्यावर होतो. आज सकाळी मुंबईत परत आल्यावर या सर्व प्रकरणाचा मी जेवढा सखोल आणि संतुलित करता येईल तेवढा अभ्यास केला. शासनातर्फ़े नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीकडून निवडल्या गेलेल्या पुस्तकाला आधी पुरस्कार जाहीर करणे आणि नंतर तो अपमानास्पदरीत्या परत घेणे, हे निव्वळ अनाकलनीय आहे.
माझ्या आतापर्यंतच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवनात मी कधीही एखाद्या विशिष्ट विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेतला नाही किंवा कोणत्याही वादात पडलो नाही. माझी बांधिलकी नेहमीच माय मराठीच्या दुधाशी राहिली. तेव्हा कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता ह्या अनुचित निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा मी राजीनामा देत आहे.