तीस हजार कार्यकर्त्यांच्या विक्रमी सभेकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीस हजार कार्यकर्त्यांच्या विक्रमी सभेकडे लक्ष
तीस हजार कार्यकर्त्यांच्या विक्रमी सभेकडे लक्ष

तीस हजार कार्यकर्त्यांच्या विक्रमी सभेकडे लक्ष

sakal_logo
By

rat१५४३.txt

(पान ३ साठी)
मुख्यमंत्री शिंदेच्या सभेची जय्यत तयारी
तीस हजार कार्यकर्ते अपेक्षित ; शहरात सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १५ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्या (ता.१६) होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुमारे ३० हजाराची गर्दी या सभेसाठी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, भैय्या सामंत, त्याचे शिलेदार राबत आहेत. सभेला येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच गुगल मॅप लिंकप्रमाणे वाहने पार्कींग करण्याबाबतच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेली ही सभा शहरातील (कै.) प्रमोद महाजन क्रीडासंकूल येथे होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सभेनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आपले शक्तीप्रदर्शन करणार आहे. सुमारे १५० एसटी बस आरक्षित केल्या आहेत. रत्नागिरी मतदार संघातील दहा जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी ३ हजार कार्यकर्ते येणार आहेत. त्याची अन्य पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या हातगाडी, फळविक्रते, भाजीपाला विक्रेत्यांनाही मुख्य मार्गाऐवजी अन्य ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये रत्नागिरी शहराची स्वच्छता करून रूपडेच पालटून टाकले आहे. सभेला येणाऱ्या वाहनांसाठी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन पार्किंग आठवडा बाजार मैदान, पटवर्धन हायस्कूल मैदान, सर्कस मैदान येथे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित कार्यक्रम ठिकाणी शहरी व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनी पोलिसदलाने निश्चित केलेल्या जागीच आपली वाहने पार्क करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना पार्किंगची जागा शोधण्यास अडचण होऊ नये म्हणून गुगल मॅपची लिंकदेखील प्रसारित करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा असा...

उद्या (ता. १६) सकाळी ११ वा. हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळावर आगमन. तेथून मारुती मंदिरला येणार. साडेअकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून श्री देव भैरीबुवाचे दर्शन घेणार. १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार. सव्वा एकला शासकीय विश्रामगृह तेथे साडेतीन पर्यंत विविध संघटनांच्या शिष्टमंडळाच्या भेटी घेणार. पावणेचार वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे भूमिपूजन त्यानंतर सव्वापाच वाजता श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण लोकार्पण सोहळ्यास सुरवात होणार आहे. त्यानंतर जाहीर सभेस उपस्थिती राहतील. रात्री साडेआठ वाजता मंत्री उदय सामंत यांच्या पाली निवासस्थानी जाणार असून, तेथून मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे आणि रात्री १०.१५ वा. विमानाने मुंबईला प्रयाण.