लोक अदालत 11 फेब्रुवारीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोक अदालत 11 फेब्रुवारीला
लोक अदालत 11 फेब्रुवारीला

लोक अदालत 11 फेब्रुवारीला

sakal_logo
By

लोक अदालत ११ फेब्रुवारीला
सिंधुदुर्गनगरीः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार २०२३ या वर्षातील पहिली राष्ट्रीय लोक अदालत ११ फेब्रुवारीला जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे आयोजन केली आहे.
-------------
दिव्यांगांसाठी शिक्षण शिबीर
सावंतवाडीः जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने दिव्यांग बंधू-भगिनींसाठी ‘फळ व पालेभाज्या प्रक्रिया साठवण’ याबाबत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १५ ते ३५ या वयोगटासाठी हे प्रशिक्षण आहे. येथील दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र जुना शिरोडा नाका येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचा हा उपक्रम आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना भारत सरकारचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. त्यांना वनांच्यामार्फत शासकीय योजनाबाबत मार्गदर्शन यात येईल. प्रवेश मर्यादित असून इच्छुकांनी तातडीने संपर्क करावा, असे आवाहन दिव्यांग विकास केंद्र सावंतवाडी यांनी केले आहे.
---------------
शिक्षण संस्थाचालकांची २७ ला बैठक
कुडाळः जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाने पवित्र पोर्टल, शाळांचे थकित अनुदान व नवीन सामाजिक उपक्रम याबाबत शनिवारी (ता.१७) शिक्षण संस्था चालकांची बैठक आयोजित केली होती. तथापि, नजीकच्या जिल्ह्यातील काही संस्था चालक तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याची व सहभागी करून घेण्याची विनंती केल्याने तसेच १८ ला जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने नियोजित बैठक रद्द करण्यात येत आहे. आता ही बैठक २७ ला जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. शिक्षण संस्थांचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त तसेच जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी २७ ला होणाऱ्या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग शिक्षण संस्था चालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. उर्फ आप्पा सामंत यांनी केले आहे.
------