मुणगेत 6 जानेवारीपासून विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुणगेत 6 जानेवारीपासून विविध कार्यक्रम
मुणगेत 6 जानेवारीपासून विविध कार्यक्रम

मुणगेत 6 जानेवारीपासून विविध कार्यक्रम

sakal_logo
By

swt१५३०.jpg
६८७७१
मुणगेः श्री देवी भगवती मंदिर

मुणगेत ६ जानेवारीपासून विविध कार्यक्रम
श्री भगवती जत्रोत्सव ः देवस्थान ग्रामसभेत उत्सवाचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १५ ः येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव ६ ते १० जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. भाविकांना देवीचे दर्शन व ओटी भरण्यासाठीचे चोख नियोजन देवस्थानच्या ग्रामसभेत करण्यात आले. भाविकांनी या जत्रोत्सवास येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवी भगवती देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
देवी भगवती देवस्थान जत्रोत्सवानिमित्त ग्रामसभा देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली काल (ता. १४) भगवती मंदिरात पार पडली. यावेळी सचिव निषाद परुळेकर, समिती सदस्य कृष्णा सावंत, प्रकाश सावंत, अनिल धुवाळी, वसंत तेली, पुरुषोत्तम तेली, रामचंद्र मुणगेकर, मनोहर मुणगेकर, देवदत्त पुजारे, गोविंद सावंत, सुनील सावंत, विश्वास मुणगेकर, सुरेश बोरकर आदी उपस्थित होते. जत्रोत्सवास येणाऱ्या व्यापारी वर्गास सहकार्य करणे, भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व लवकरात लवकर मिळावे, यासाठी वाडीवार स्वयंसेवकांची नियुक्ती करणे, पार्किंग व्यवस्थेसाठी होमगार्ड मागविणे, भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन सभेत करण्यात आले.
उत्सवाच्या पाच दिवसांमध्ये वाडीवाडीतील मंडळांची भजने सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत, गोंधळी गायन सायंकाळी साडेपाच ते सहावाजेपर्यंत, साडेसहा ते सात नौबत, रात्री आठ ते साडेदहापर्यंत बाहेर गावची भजने, अकरा वाजता प्रवचन व पुराण वाचन, बारा वाजता पालखी सोहळा, गोंधळी गायन, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. भजनी मंडळांनी कृष्णा सावंत, पुरुषोत्तम तेली यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी रामतीर्थ कारेकर, दिगंबर पेडणेकर, लक्ष्मण घाडी, बाळकृष्ण परब, अजित रासम, बाबा मेस्त्री, संतोष पाडावे, किशोर पेडणेकर, पंडित आईर, धाकोजी सावंत, कृष्णा गुरव, मनोज सावंत, प्रभाकर घाडी, आप्पा घाडी, देविदास मुणगेकर, एकनाथ मुणगेकर, सत्यवान घाडी, बाबाजी घाडी, रमेश परब, मोहन मेस्त्री, अजित ठाकूर, पंडित आईर, उत्तम मुणगेकर, अशोक मुणगेकर, अमित सावंत, रघुनाथ मेस्त्री, विश्वनाथ बोरकर, वसंत तेली, प्रभाकर देवळी, गणेश सावंत, भालचंद्र राणे, संजय लब्दे, शेखर गुरव, प्रकाश मुणगेकर, अशोक पुजारे, अनिल सावंत, संतोष लब्दे, विजय परब, सहदेव पवार, मोहन असवडेकर, शंकर नाटेकर, प्रकाश परब, प्रमोद सावंत, प्रकाश मुरकर, यशवंत नाटेकर, दीपक गुरव, अशोक परब, बाळा मसुरकर, संदीप रासम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.