
वाहनांना टोल मुक्तीसाठी जिल्ह्यावासियांचा संघर्ष
kan162.jpg
68825
कणकवली ः ओसरगाव येथील टोल नाक्याची पाहणी करताना जिल्हातील नागरिक.
----------
वाहनांच्या टोल मुक्तीसाठी
जिल्ह्यावासियांचा संघर्ष
सकाळ वृतसेवा
कणकवली,ता. १६ ः ओसरगाव येथे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी मिळावी यासाठी सोशल मीडियावर संघर्ष सुरू झाला आहे. यातील काही नागरिकांनी गुरुवारी दुपारी ओसरगाव येथील टोलनाक्यावर जमून पाहणी केली आहे. जिल्ह्यातील वाहनाना टोल मुक्ती मिळावी म्हणून संघर्ष सुरू झाला आहे. यासाठी सोशल मीडियावरून सध्या जनजागृती सुरू आहे. ठिकठिकाणी बैठक घेऊन जनजागृती केली जात आहे. रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असताना महामार्ग प्राधिकरणने ओसरगाव येथे टोल वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्यक्षात टोल वसुली सुरू झाली नसली तरी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर वाहनांवर टोल आकारला जाईल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक एकत्र येऊन बैठका घेत आहे. गुरुवारी (ता. १५) वैभववाडी, ओसरगाव, कसाल येथे बैठका घेण्यात आला.