बिबट्याची दहशत असलेल्या मार्गावर प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याची दहशत असलेल्या मार्गावर प्रवास
बिबट्याची दहशत असलेल्या मार्गावर प्रवास

बिबट्याची दहशत असलेल्या मार्गावर प्रवास

sakal_logo
By

rat१६२६.txt

(टुडे पान २ साठी मेन)

फोटो ओळी
-rat१६p२४.jpg -
६८८५८
वाकवली-उन्हवरे ह्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. टेटवली येथे खड्डेमय झालेला रस्ता.
-

बिबट्याची दहशत असलेल्या मार्गावरुन प्रवास

वाकवली-उन्हवरे रस्ता दयनीय ; पर्याय ठरतो धोकादायी
सकाळ वृत्तसेवा ः
गावतळे, ता. १६ ः दापोली तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यापैकी एक असलेला वाकवली-उन्हवरे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. गावतळे पुढील गावातील वाहनचालकांना साखलोळीमार्गे जावे लागत आहे. हा रस्ता सुस्थितीत आहे पण त्यावर बिबट्याचा वावर असतो. या रस्त्यावर बिबट्याने अनेकांना हल्ला करून जखमी केले आहे. अशा धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. २०१८ मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र पहिल्याच पावसात ते उखडले. त्यामुळे ग्रामस्थांनी दापोली उपअभियंता कार्यालयात धडक दिली. वर्षभरात ठेकेदाराने परत काम केले, मात्र ते वर्षभरात परत उखडले.
वाकवली-उन्हवरे हा रस्ता दाभीळ पांगारी, उन्हवरे, भडवळे या तिन्ही मार्गांचा मध्यबिंदू असल्याने तसेच याच मार्गावर मराठा दरबार, पन्हाळेकाजी लेणी, उन्हवरे गरम पाण्याचे कुंड ही पर्यटनस्थळ असल्याने या मार्गावर नेहमी रहदारी असते. २०१८ मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र पाहिल्याच पावसात ते उखडले. त्यामुळे ग्रामस्थांनी दापोली उपअभियंता कार्यालयात धडक दिली. या रस्त्याकडे कोणत्याही राजकीय नेत्याने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी भरला असून या रस्त्यावर प्रवास करण्यास वाहकांना खूपच खडतर जात आहे. यास पर्याय म्हणून गावतळे, साखलोळी, साखलोळी नं. १ यामार्गे दापोली हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला रस्ता अजूनही बऱ्या‍पैकी स्थितीत आहे. पर्याय म्हणून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. पण या मार्गावर गेल्या दोन वर्षांत सुमारे ८ दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केला. अनेकानी बिबट्याला या रस्त्यावर वावरताना पाहिले असून अनेकवेळा वनविभागाने साखलोळीसह दोन गावांमध्ये असलेल्या जंगलमय भागात गस्त वाढविली होती.

नाईलाजाने दहशतीखाली प्रवास...
साखलोळीमार्गावरील रस्ताच्या कडेला वनविभागाने बिबट्यापासून सावध रहा असे फलक लावले आहेत. केवळ वाकवली-उन्हावरे रस्ता निकृष्ट दर्जाचा व खड्डेमय झाल्याने नाईलाजास्तव बिबट्याच्या दहशतीखाली अनेक दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.