दापोली कृषी विद्यापिठाचे कुणकेरकर सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोली कृषी विद्यापिठाचे कुणकेरकर सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ
दापोली कृषी विद्यापिठाचे कुणकेरकर सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ

दापोली कृषी विद्यापिठाचे कुणकेरकर सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ

sakal_logo
By

swt१६७.jpg
६८८७६
पुणेः येथे डॉ. रमेश कुणकेरकर यांचा सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून गौरव करताना अब्दुल सत्तार.

डॉ. रमेश कुणकेरकर सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ
भरीव संशोधनात्मक कार्याबदल पुण्यात गौरव; दापोली कृषी विद्यापीठात कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. रमेश कुणकेरकर यांचा सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून गौरव करण्यात आला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्यावतीने आयोजित ५० वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक, २०२२ चा उद्घाटन समारंभ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास अब्दुल सत्तार, कृषि मंत्री तथा प्रति उपकुलपती, कृषि विद्यापीठ हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
यावेळी एकनाथ डवले (भाप्रसे), अपर मुख्य सचिव (कृषि), महाराष्ट्र राज्य तसेच रावसाहेब भागडे (भाप्रसे) महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे, डॉ. संजय सावंत, कुलगुरु डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरु, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. इन्द्रमणी, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, डॉ. शरद गडाख, कुलगुरु डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला तसेच चारही विद्यापीठाचे संशोधन, शिक्षण, विस्तार संचालक उपस्थित होते.
या प्रसंगी चारही कृषि विद्यापीठामध्ये उत्कृष्ट संशोधन केलेल्या संशोधकांना उत्कृष्ट कृषि संशोधन केलेल्या संशोधकांना उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली कार्यरत असलेले डॉ. कुणकेरकर, प्रमुख, कृषि वनस्पतीशास्त्र विभाग यांनी केलेल्या भरीव संशोधनात्मक कार्याबदल त्यांना उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुणकेरकर हे २८ वर्षे विद्यापीठांच्या अविरत सेवेत असून त्यांनी भात पिक, नाचणी, वरी, भुईमुग या पिकांमध्ये उल्लेखनीय संशोधन कार्य केले आहे. विविध पिकाच्या विविध गुण वैशिष्टये असलेल्या १५ सुधारीत आणि संकरीत जाती प्रसारित करुन पी. पी. व्ही. एफ. आर. ए. कडे नोंदणी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. संकरीत व सुधारीत भात बिजोत्पादन घेण्याकरीता शेतकरी महाबीज, खाजगी कंपन्या यांना मार्गदर्शन केले. त्यांना अनेक पुरस्कारही प्रात्त झाले आहेत.