
-नवजीवनमधून दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत
rat१६१४.txt
(टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१६p५.jpg ः
६८८४२
राजापूर ः शिक्षक रवींद्र वासुरकर यांचा सत्कार करताना संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर.
---
नवजीवनमधून दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत
रवींद्र वासुरकर ; वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उदघाटन
राजापूर, ता. १६ ः नवजीवन हायस्कूलमधून जास्तीत जास्त दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी आपले सहकार्य राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय कबड्डी पंच व आदर्श शिक्षक रवींद्र वासुरकर यांनी केले. या वेळी त्यांनी संस्थेसह नवजीवन हायस्कूलतर्फे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक करताना खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
शहरातील नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि फनफेअरचे उद्घाटन रवींद्र वासुरकर यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय महिला क्रिकेटपटू वैष्णवी गुरव हिच्या उपस्थितीमध्ये झाले. या वेळी संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर, संस्थेचे सचिव मजीद पन्हळेकर, सदस्य मुश्ताक नाखवा, अशफाक काझी, इरफान डोसानी, राजेंदकुमार व्हनमाने आदी उपस्थित होते. प्राचार्य व्हनमाने यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीने खेळल्यास यश आपोआप संपादन होईल, असे सांगितले.