
आपण मनानेही ज्येष्ठ हे पुढच्या पिढीला कळूद्याे
rat१६३०.txt
( टुडे पान २ )
-----
ज्येष्ठांकडे अनुभवाची शिदोरी...
डॉ. चंद्रकांत मोकल ;ज्येष्ठ नागरिक संघ, दापोलीतर्फे सत्कार
दाभोळ, ता. १६ ः ज्येष्ठांजवळ अनुभवाची शिदोरी असून, आर्थिक स्थिती उत्तम आहे. त्यांनी पर्यटन व्यवसाय तसेच कृषिक्षेत्रातून अर्थार्जन केल्यास आपण तंदुरुस्त, कार्यमग्न राहून उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगू शकतो. नव्या ऊर्जेचे प्रेरणास्रोत बनू शकतो. ज्येष्ठता आचार-विचारामध्ये दिसली पाहिजे. शरीराबरोबर मनाने ज्येष्ठ आहेत हे पुढच्या पिढीला पटवून द्या, असे आवाहन केले.
ज्येष्ठ नागरिक संघ, दापोलीतर्फे नुकताच माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांचा अध्यक्ष राजाराम मडव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. मंगल सणस यांनी सत्कारमूर्ती तथा मार्गदर्शक डॉ. मोकल यांचा परिचय करून दिला.
डॉ. मोकल यांनी १९७०-८० च्या दशकात वैद्यकीय क्षेत्रात प्रथितयश डॉक्टर म्हणून नावलौकिक प्राप्त केले असून, मनिषा नर्सिंगहोम (दापोलीतले पहिले हॉस्पिटल) राजीव गांधी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपटी येथील दापोली मेडिकल कॉलेजची स्थापना तर शिक्षणक्षेत्रात दापोली शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष, भाग शाळांची निर्मिती, अशी त्यांची कामगिरी आहे. १९८५ मध्ये दापोली-मंडणगड विधानसभेचे आमदार म्हणून त्यांची निवड झाली. फेरीबोटींची निर्मिती करून (रत्नागिरी, रायगड) पर्यटन विकासाला त्यानी चालना दिली. मोकल यांच्या या कामगिरीचा गौरव करण्यात आला. कोकण कृषी विद्यापीठ येथे कार्यकारी समितीच्या सदस्यपदीही कार्य केले. त्यांच्या हस्ते शैलजा मेहता, दत्तात्रय मुरुडकर, वसंत आंबेकर, यशवंत जोशी या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. राजाराम मडव व श्रीकृष्ण पेठे यांनी डॉ. मोकल यांच्या कार्याचा उल्लेख करून ज्येष्ठांसाठी ते आदर्शवत आहेत असे मत व्यक्त केले.