चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

खेडमध्ये दिव्यांग
मतदारांसाठी शिबिर
खेड ः दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी व तालुका अपंग पुनवर्सन संस्था यांच्यावतीने तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, निवडणूक नायब तहसीलदार राठोड, रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग मतदार नावनोंदणी शिबिर घेण्यात आले. दिव्यांग मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहचताना उद्भवणार्‍या समस्या व दिव्यांग मतदार यांना मतदान कक्षाजवळ आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली तसेच तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी येथे शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे निवेदन दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत सावंत यांनी नायब तहसीलदार सिनकर यांना दिले.

डीबीजेचे एमकॉममध्ये यश
चिपळूण ः येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयातील एमकॉम द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. कोरोनाच्या परिस्थितीनंतर प्रथमच जून महिन्यात विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाद्वारे ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. द्वितीय वर्षाच्या ६४ विद्यार्थ्यांपैकी ६२ विद्यार्थी चांगल्या ग्रेडने उत्तीर्ण झाले. द्वितीय वर्षाचा एकूण ९७ टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम गुलशन वरवटकर (९१.५० टक्के), द्वितीय पल्लवी काटदरे (९०.९४) आणि तृतीय प्राजक्ता प्रभुणे (८८.६०) यांनी यश मिळवले. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश तांबे व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. चांदा, एम. कॉम. समन्वयक खवणेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

खेड क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे चौघे जिल्हा संघात
खेड ः सोलापूर येथे होणार्‍या महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएनशच्या १४ वर्षाखालील निमंत्रण क्रिकेट स्पर्धेसाठी खेड क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या चार खेळाडूंची जिल्हा क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या जिल्हा संघात निवड झाली आहे. धनंजय झोरे, ऐमन गोंधळेकर, श्रवण शिर्के, तनुज इनारकर या खेळाडूंचा समावेश आहे. रत्नागिरी येथे १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी झाली. यात चौघांसह दाऊद परकार यांची संभाव्य संघात निवड झाली. त्यानंतर निवडलेल्या खेळाडूंचे सराव सामने खेळवण्यात आले त्यामधून अंतिम १५ खेळाडू निवडण्यात आले. यामध्ये चौघांचा समावेश आहे. या खेळाडूंचा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएनशचे अध्यक्ष रहिम सहिबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.