सावंतवाडी पोलिस अर्लट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी पोलिस अर्लट
सावंतवाडी पोलिस अर्लट

सावंतवाडी पोलिस अर्लट

sakal_logo
By

swt१६१५.jpg
६८९१९
माजगावः चराठा गावात पोलीसांकडून संचलन करण्यात आले.

सावंतवाडी पोलिस अर्लट
ग्रामपंचायत निवडणुक ः माजगाव, चराठ्यासह बांद्यात संचलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. माजगाव, चराठा, बांदा आदी गावात पोलिसांनी संचलन करत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी ज्या-ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या भागाचीही पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यातील सात ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध सरपंच निवडून आल्याने आता उर्वरित ४५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार होऊ शकतो, म्हणून पोलिसांनी गावागावात पोलीस पाटील तसेच पोलीस कर्मचारी यांना अलर्ट केले आहे. आज बांदा, माजगाव, चराठा आदी गावांमध्ये पोलिसांनी संचलनही केले आहे. या संचलनामध्ये पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, शामराव काळे आदींसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

चौकट
पोलीस अधीक्षकांकडून आढावा
पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी काल (ता.१५) रात्री उशिरा सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव, कुणकेरी या गावांना भेटी देऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी मतदान यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. तेथील भागाचीही पाहणी केली व पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या. तालुक्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.