सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना
सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना

सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना

sakal_logo
By

kan१६३.jpg
६८९३०
मुंबईः येथे सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे उद्‍घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. सोबत देवेंद्र फडणवीस आदी.
-----
सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना
कणकवली,ता. १६ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिकांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचा प्रारंभ मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाला. जिल्ह्याच्या शेती विकासासाठी मुंबईत वास्तव्यात असलेल्या लोकांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केल्याने हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी नमूद केले. या कंपनीमध्ये कळसुलीचे सुपुत्र हनुमंत सावंत, श्रीकृष्ण परब, दीपक म्हसकर, मिलिंद प्रभू हे संचालक आहेत.
कंपनीच्या माध्यमातून कॉम्प्रेसर बायोगॅस निर्मिती, नॅपनीअर गवत उत्पादन डेरी, काजू प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, तलावात बोटिंग क्लब, फिशिंग क्लब, स्कुबा डायव्हिंग असे उपक्रम राबविले जाणार आहेत. उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नत्ती साधण्याचा उद्देश असल्याचे हनुमंत सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमास मुंबई येथे आमदार प्रसाद लाड, आमदार संजय शिरसाठ आदी उपस्थित होते.