दाभोळ-दापोलीत शिक्षणमंत्री पाटीलांविरोधात मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दापोलीत शिक्षणमंत्री पाटीलांविरोधात मोर्चा
दाभोळ-दापोलीत शिक्षणमंत्री पाटीलांविरोधात मोर्चा

दाभोळ-दापोलीत शिक्षणमंत्री पाटीलांविरोधात मोर्चा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१६p२६.jpg ःKOP२२L६८८६७ दापोली ः तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देताना मोर्चेकरी.
-------------

दापोलीत शिक्षणमंत्री पाटीलांविरोधात मोर्चा
दाभोळ, ता. १६ ः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत काढलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल बौद्धजन सेवा संघ मध्यवर्ती कमिटी यांच्या नेतृत्वाखाली विविध १६ संघटनांनी दापोलीमध्ये गुरुवारी (ता. १५) दुपारी निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. दापोलीत बौद्धजन सेवा संघ मध्यवर्ती कमिटी यांच्या पुढाकाराने दापोलीत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर बसस्थानक, बाजारपेठ, पोस्टगल्लीमार्गे हा मोर्चा दापोलीच्या तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चेकरांनी विविध घोषणा दिल्या. या वेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करून शासनाने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले.