कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधीकरण
कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधीकरण

कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधीकरण

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat१६p४२.jpg- रत्नागिरी- जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सोबत उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, मंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर आदी.
-----

कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरणाची स्थापना

मुख्यमंत्री शिंदें ; विकासाचा बॅकलॉक भरून काढणार
रत्नागिरी, ता. १६ : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार आहे. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा मोठ्या प्रमाणावर राहिलेला बॅकलॉग भरून काढण्याचे काम हे प्राधिकरण करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांच्या आढावा बैठकीत शुक्रवारी ते बोलत होते. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच उपस्थित होते. जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी स्वागत करून जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा सादर केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी देखील यावेळी जिल्हा परिषदेच्या योजनांचे सादरीकरण केले. आमदार शेखर निकम, योगेश कदम, माजी खासदार नीलेश राणे यांनी विकासाबाबत विविध मागण्या मांडल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत प्रयत्न केले जातील. मत्स्य व्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय पॉलिसी बाबत अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल. राज्यातील गड किल्ल्यां बरोबरच कोकणातील गड किल्ल्यांबाबत निर्णय घेतले जातील. केरळ प्रमाणे बॅक वॉटरमध्ये पर्यटन वाढीसाठी बांधा आणि वापरा तत्वावर विविध सेवा सुविधा पुरवल्या जातील. कोकणातील साकव, विम्यातील त्रुटी, बीच डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न, सिंचनाच्या सुविधा याबाबत प्रयत्न केले जातील.’

चौकट
मुंबई ते सिंधुदुर्ग एक्सेस कंट्रोल मार्ग
औरंगाबाद-पुणे मार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग हा एक्सेस कंट्रोल मार्ग करता येईल का? याबाबतही अभ्यास करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी बैठकीत सांगितले.