
साखरपा ः कोंडगाव, मेघीत येणार महिलाराज
रणधुमाळी--लोगो
साखरपा, कोंडगाव, मेघीत येणार महिलाराज
साखरपा, ता. १६ ः आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत साखरपा, कोंडगाव आणि मेघी या तिन्ही गावात महिला आरक्षणामुळे महिला राज येणार हे निश्चित झाले आहे. साखरपा आणि मेघी येथील निवडणुका बिनविरोध झाले असून कोंडगाव येथे चित्र स्पष्ट होणे बाकी आहे. साखरपा, कोंडगाव आणि मेघी या तीनही गावांमध्ये महिला सरपंच विराजमान होणार आहे. मेघी आणि साखरपा येथे सर्वसाधारण महिला हे आरक्षण असून कोंडगाव येथे सरपंचपद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या तिनही गावाची सुत्रे आता महिलांच्या हातात असणार आहेत. यापैकी साखरपा येथे रूचिता जाधव यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्याचबरोबर मेघी गावात शीतल हेगिष्टे यांचीही निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांच्या काळात या तीनही गावात महिलांच्या हाती गावाच्या विकासाची सुत्रे असणार आहेत हे स्पष्ट झाले आहेत.