गावपातळीवरील राजकारणही जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावपातळीवरील राजकारणही जोरात
गावपातळीवरील राजकारणही जोरात

गावपातळीवरील राजकारणही जोरात

sakal_logo
By

प्रमुख ग्रामपंचायतीत
भाजप विरुध्द आघाडी
देवगड तालुकाः गावपातळीवरील राजकारणही जोरात
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ः तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नेतेमंडळी प्रचारात उतरली होती. भाजप विरुद्ध आघाडी असे सर्वसाधारण चित्र असले तरी काही भागात गावपातळीवरील विषय असल्याचेही दिसून येत आहे.
तालुक्यातील ३८ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. एकूण आठ सरपंच बिनविरोध झाले असून एका ठिकाणी सरपंचपदासाठी अर्ज आलेले नाहीत. १४६ सदस्य बिनविरोध झाले आहेत. निवडणूक घोषित झाल्यापासून राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. आमदार नीतेश राणे यांनी ग्रामपंचायतनिहाय आढावा घेत प्रचाराची रणनीती आखली. कार्यकर्ते, स्थानिक नेते यांच्यासोबत बैठका घेत काही भागात कार्यकर्त्यांमध्ये जाणवणारी संभाव्य नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला.
आपापसातील मतभेदांमुळे निवडणुकीतील पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी प्रयत्न केले गेले. राज्य पातळीवरील शिवसेना फुटीनंतर मुळ शिवसेनेचे अर्थात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्चस्व राखण्यासाठी मोठी कसोटी आहे. एकीकडे भाजपला दूर ठेवायचे आहे तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाशीही सामना करावयाचा आहे. तरीही मध्यंतरी झालेल्या दोन ग्रामपंचायत निवडणुकीत एका ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाने विजय संपादन केला होता.
यावेळीही आपली ताकद दाखवण्यासाठी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी तालुका दौरा करुन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. शिवसेना नेतेमंडळी कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढविण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेना फुटली असली तरी आपल्यालाच यश मिळेल असा आत्मविश्वास शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे जोरदार प्रयत्न आहेत. आमदार नीतेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला असून राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजप सरकारकडून गाव विकास साधण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी संवाद साधत विजय संपादन करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
गावपातळीवरील संभाव्य जाणवणारी कार्यकर्त्यांमधील कुरबुरी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. खासदार राऊत यांच्यासह अन्य नेत्यांनी विकास कामांचा मुद्दा समोर ठेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काही भागात गाठीभेटी घेत निवडणुकीत प्रचार करण्यात आला. मात्र, तरीही मतदानापर्यंत कार्यकर्त्यांशी संपर्क राहणार असल्याचे दिसून येत आहे. काही गावात गाव पातळीवर उमेदवार दिले गेले असल्याने तेथे स्थानिक कार्यकर्त्यांवर प्रचार सोपविण्यात आला असल्याचेही चित्र होते.

चौकट
उपसरपंच पदासाठी सदस्य निवडीचाही विचार
थेट सरपंच निवडीमुळे राजकीय पक्षांचा प्रचाराचा जोर त्या अनुषंगाने होता. मात्र, उमेदवारांच्या जनमताचा अंदाज घेत पक्षाची पिछेहाट झाली तर उपसरपंच पदासाठी सदस्य निवडून येण्याचाही विचार करण्यात आला आहे.