
क्राईम पट्टा
rat१६४१. txt
(पान ३ साठी)
मुरुगवाडा येथे दुचाकी अचानक पेटली
रत्नागिरी ः शहरातील मुरुगवाडा येथे घराशेजारी उभी पार्किंग केलेली दुचाकीने अचानक पेट घेतल्याने नुकसान झाले; मात्र आग कशामुळे लागली हे अद्यापही समजू शकले नाही. शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केतन जयवंत मयेकर (वय ३५, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) यांनी दुचाकी त्यांच्या घराच्या शेजारी उभी केली होती. त्या दुचाकीला रात्रीच्या सुमारास आग लागल्याचे दिसून आले. मयेकर यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात यश मिळवले; मात्र दुचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी मयेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरून पोलिसांनी नोंद केली आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
मारहाणप्रकरणी दंडाची शिक्षा
रत्नागिरी ः तालुक्यातील चाफे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याविरोधात उभा राहून निवडून आला याचा राग मनात धरून मारहाण करणाऱ्या पाचजणांना न्यायालयाने प्रत्येकी चार हजारप्रमाणे २० हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद शिक्षा सुनावली. सुभाष पुंडलिक रहाटे (वय ५६), भाग्यश्री सुभाष रहाटे (४२), ओंकार सुभाष रहाटे (२३), प्रशांत पुंडलिक रहाटे (३०) (चौघेही रा. चाफे रत्नागिरी) आणि गजानन वसंत रहाटे (३२, रा. तेलीआळी, रत्नागिरी) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही घटना १२ ऑगस्ट २०१५ ला मिरवडेवाडी येथे घडली होती. यात गाडीची काचही फोडण्यात आली होती. या प्रकरणी पद्मशेखर मुळ्ये (वय २९, रा. चाफे, रत्नागिरी) पोलिस ठाण्यात तक्रार दिली. न्यायालयाने सर्व आरोपींना सर्वांना प्रत्येकी ४हजार रुपयेप्रमाणे २० हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.