अनंत जाधव यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनंत जाधव यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर
अनंत जाधव यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

अनंत जाधव यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

swt१६१४.jpg

अनंत जाधव

ज्येष्ठ पत्रकार अनंत जाधव
यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यात जिल्ह्यातून जेष्ठ पत्रकार अनंत जाधव यांच्यासह रक्तदान क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथे पत्रकार अधिवेशन कार्यक्रमात २७ ला याचे वितरण होणार आहे. भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना म्हणून ऑल जर्नलिस्ट फ्रेड सर्कल गेले अनेक वर्षे काम करत आहे. या अधिवेशनात ऑल जर्नलिस्ट फ्रेड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्राप्त पत्रकाराबरोबर राज्यातील दोन सामाजिक संस्थाना गौरविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा समावेश आहे. श्री. जाधव हे गेली २० वर्षे जिल्ह्याच्या पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात रक्तदान, देहदान चळवळ समाजामध्ये उभारून कार्यरत आहे. रक्तदान क्षेत्रात लक्षणीय कार्य संस्था करत आहे. त्यांचा या जीवनदान चळवळीची दखल घेतली आहे.
---------------