सदर ः खाद्यसंस्कृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः खाद्यसंस्कृती
सदर ः खाद्यसंस्कृती

सदर ः खाद्यसंस्कृती

sakal_logo
By

१२ डिसेंबर पान २ वरून लोगोव व लेखकाचा फोटो घेणे...

खाद्यसंस्कृती............लोगो

फोटो ओळी
-rat18p6.jpg ः राजीव लिमये
-------
---
पर्यटकांचे मन जिंकणारी कोकणी खाद्यसंस्कृती!

कोकणी खाद्यसंस्कृतीचा प्रसार होण्यासाठी अत्यंत अनुकूल स्थिती असल्याचे तुम्हांला जाणवतेय ना? पाहुणे वा पर्यटक दोघांचेही मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो. तळकोकणातील समुद्रकिनारे, ऑलिव्ह रिडले टर्टल्सचे नेस्टिंग, बॅकवॉटर सफारी, मॅन्ग्रुव्हज, इथला पावसाळा नव्याने उजेडात आलेली कातळशिल्पे याबरोबरच कोकणी खाद्यसंस्कृतीसुद्धा शहरी पर्यटकांना आकर्षित करत आहे. कोकणात येणारे पर्यटक अनुभवसंपन्न पर्यटनासाठी अत्यंत उत्सुक आहेत. त्यांना अपेक्षित असलेला सुखद अनुभव, इथल्या निसर्गातून लोकसंस्कृतीतून आणि खाद्यसंस्कृतीतून पुरेपूर देऊ शकतो, हा आत्मविश्वास वृद्धिंगत होत आहे.

-राजीव लिमये, कर्ले, रत्नागिरी


कोकणातील नव्याने आकारात येणाऱ्या पर्यटनाच्या व्यवसायामध्ये आंब्याच्या बागातील निसर्ग पर्यटन, समुद्र अन् खाडीकिनाऱ्यावरचे होमस्टे असे अनेक आयाम देणाऱ्या नवतरुण उद्योजक तसेच अनुभवी व्यावसायिकांशी संवाद साधला तर याचा तुम्हाला खचितच अनुभव येईल. आपण स्वतः जेव्हा हिमाचल, पंजाबमध्ये वा दक्षिणेत पर्यटनासाठी जातो त्या वेळच्या आपल्या मनोभूमिकेचा विचार केलात तर काय जाणवते? त्या वेळी तिथल्या मिश्र भाज्या, पराठे, छोले भटुरे, सरसोंका साग असे पदार्थ आपण चवीने खातो, त्यांचे फोटो इन्स्टाग्राम, व्हॉटस्अॅप स्टेटस, फेसबुकवर शेअर करतो ना? दाक्षिणात्य पदार्थ तर दैनंदिन आहारात सहज सामावले आहेत. याच पद्धतीने अगदी मुंबई-पुण्याचा पर्यटक किंवा अगदी परदेशी पर्यटक आपल्याकडे येतो तेव्हा त्यालासुद्धा इथल्या खाण्याबद्दल उत्सुकता असतेच. सहज विचार केला तर शाकाहारी पदार्थांमध्ये आपली प्रतिमा फक्त मोदक, पुरणपोळी यांनीच तर व्यापली नाहीना? या विषयी आत्मसमाधानी राहण्याऐवजी आपल्या खाद्यसंस्कृतीतील बलस्थाने लक्षात घेऊन त्यांचा पर्यटनवृद्धीसाठी वापर करणे महत्वाचे. या दृष्टीने कोकणी सी फूडविषयी छान प्रसार झालाय, असे प्रथमदर्शनी जाणवते. मला त्यातली जाणकारी नसली तरी त्यापलीकडे जाऊन मत्स्याहारातील तिसऱ्या, मुळे, एकशिपी, खेकडे, कालवे, खाडीतले विविध मासे असे जिव्हा चाळवणारे विलोभनीय वैविध्य पर्यटकांपर्यंत पूर्णपणे पोचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचे कौतुकच आहे. अधिकाधिक प्रभावीपणे अशा विविध चवी घेण्यासाठी पर्यटकांना प्रवृत्त करण्याचे मार्ग चोखाळण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. शाकाहारातील शहरी पर्यटकांना फार माहिती नसलेले घावणे-उसळी, नारळरसातील शेवया, तांदळाच्या रव्याची गूळ घालूनची खांडवी, भाजणीचे वडे, आंबोळ्या, इकडची मिसळ, तिखटमिठाच्या पुऱ्या, घारगे, भजी आदी खाद्यपदार्थ येणाऱ्या पर्यटकांचे मन जिंकतात, असा अनुभव आहे. आपल्याकडे नव्यानेच रूजत असलेल्या होमस्टेमधून असे चविष्ट पदार्थ खाऊन तृप्त झालेला पर्यटक माऊथ पब्लिसिटी तर करेलच शिवाय आपल्या वृत्तपत्रातून, ललित साहित्यातून, कथा कादंबऱ्यांतून यावरच्या डॉक्युमेंटरीज, व्हीब्लॉग्जमधून, युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियातून हे शाकाहारी, मत्स्याहारी पदार्थांचे वैविध्य रसिक वाचक पर्यटकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोचवता आले तर त्याचा सकारात्मक परिणाम दृग्गोचर होण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रतिथयश लेखक (कै.) जयवंत दळवींच्या साहित्यात असलेला मत्स्याहारातील बारकाव्यांचा सहज उल्लेख वाचकांना भावतो. प्रभावी जाहिरातींच्या माध्यमातूनही असे घडत असल्याची यशस्वी उदाहरणे तुरळक असली तरी समोर येत आहेत. या नवीन वाटांचे राजमार्ग व्हावेत अशी सर्वच कोकणप्रेमींची अपेक्षा असणार! असे खमंग कोकणी पदार्थ समुद्रकिनाऱ्यावरील गाड्यांवर ठेवण्याची नावीन्यपूर्ण कल्पना काही नवोन्मेशी व्यावसायिकांच्या मनात डोकावली असेलही. आमच्या खासगी संमेलनाला आलेल्या विख्यात शेफने कुळिथाचे पिठले थोड्याफार बदलासह कुळीथ सूप म्हणून सर्व्ह केल्याचा अनुभव यशस्वी झाल्याचा मासलेवाईक अनुभव सांगितला होता. कॉंम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टच्या काउंटर्सवर असे काही कोकणी पदार्थ कल्पकतेने ठेवण्याची सुरवात इथल्या नामांकित रिसॉर्ट, हॉटेल व्यावसायिकांनीही विचार केला असेलही. त्यातून येणाऱ्या फीडबॅकच्या आधाराने त्यात वाढ करता येईल का? आपल्याकडची नीरा, माडीचे ब्रॅंडिग करता येण्याची शक्यताही दर्दींनी पडताळून पाहावी. फणसाचे तळलेले गरे, आंब्याच्या वड्या, करवंद वड्या, सोलकढी यांनी मस्त मार्केट मिळवलंय. या उत्पादनांची रेंज व दर्जा वृद्धिंगत होत आहे. आनंदाची बाब म्हणजे कोकणातील काजू, आंबा, करवंदे, जांभळे आदी विविध फळांपासून वाईन बनवण्याचे प्रकल्प यशस्वी होत आहेत. अशा वाईन्समध्ये वैशिष्ट्यपूर्ण चवींसोबत औषधी गुणही खचितच असणार. कोकणी खाद्यसंस्कृतीचा पर्यटनाद्वारे होणारा प्रसार पर्यटनाबरोबर कोकणी समाजजीवनही समृद्ध करेल.