सदर ः लोकल टू ग्लोबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः लोकल टू ग्लोबल
सदर ः लोकल टू ग्लोबल

सदर ः लोकल टू ग्लोबल

sakal_logo
By

पान ३ टुडे १२ डिसेंबरच्या पानवरून लोगो व लेखकाचा फोटो श्घेणे


शिक्षण ः लोकल टू ग्लोबल............लोगो

फोटो ओळी
-rat१८p१४.jpg ः - डॉ. गजानन पाटील
--------------
शालेय स्तरापासून व्यावसायिक शिक्षण ः औद्योगिक विकासाचा पाया

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाशी जोडले जाणार आहे. शालेय स्तरापासूनच व्यावसायिक शिक्षणाची सवय लागली तर मूल भविष्यात उद्योजक बनू शकते. यासाठी प्राथमिक शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कौशल्य उपक्रम समाविष्ट करण्याची तयारी केली आहे. पाश्चात्य राष्ट्रातील शिक्षणप्रणालीप्रमाणे आपल्या देशातसुद्धा शालेय विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणाशी जोडले जाणार आहे. शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे ज्या योगे मुलाच्या आवडी व कलेनुसार त्याला शिकता येईल. यासोबतच उच्च शिक्षणामध्ये आधुनिक-अनुकूल कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे. उद्याच्या कालखंडात सर्वांना नोकऱ्या मिळणे कठीण आहे तसेच देशातील उद्योग क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच शिक्षणानंतर रोजगाराची समस्या दूर करणे हा मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश प्राथमिक स्तरापासून सुरू केला आहे. खरंतर अत्यंत महत्वाकांक्षी असलेला हा निर्णय प्रत्येक मुलाचे भविष्य घडवू शकतो. प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात उद्योग व्यवसाय विकासाची गरज आहे.
- डॉ. गजानन पाटील
---------------

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण घेत असतानाचा कौशल्यपूर्ण अॅक्टिव्हिटींवर भर दिला जाणार आहे. सहावी ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत व्यावसायिक शिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. स्किल इंडिया मिशनअंतर्गत नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने समग्र शिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या संदर्भात माध्यमिक शाळा प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पॉलिटेक्निक या संस्थांशी करार केला जाणार आहे. सन २०२५ पर्यंत शालेय आणि उच्च शिक्षणप्रणालीतील ५० टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाशी जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. व्यावसायिक आणि कौशल्य विकास योजना लागू करण्याच्या योजनेअंतर्गत, घरगुती आणि जागतिक गरजांचे आकलन करण्यासाठी उद्योगांची मदत घेतली जात आहे जेणेकरून शिक्षणानंतर रोजगाराची समस्या दूर करण्याबरोबरच उद्योगांच्या गरजा पूर्ण करता येतील. आपल्या देशात कौशल्यावर आधारित शिक्षण मोठ्या प्रमाणात विकसित झाले नसल्याने कौशल्य कामगार फार कमी प्रमाणात तयार झाले आहेत. कौशल्य कामगारापेक्षासुद्धा उद्योजक दृष्टी असलेला विद्यार्थी तयार केला तर कदाचित उद्योगक्षेत्रामध्ये आपली प्रगती जास्तीत जास्त होईल शिवाय सध्याची शिक्षणानंतर बेरोजगाराची ही समस्या आहे ती समस्यासुद्धा सुटू शकेल. त्यासाठी मात्र शालेय शिक्षणातील नवीन युगाच्या कौशल्य विकासाखाली अभ्यासक्रम तयार करण्यावर आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणावर विशेष भर द्यावा लागेल.
या अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, कोडिंग, डेटा सायन्ससारख्या अभ्यासक्रमांवर भर दिला जाणार आहे. शाळांमध्ये कौशल्य प्रयोगशाळा सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरू करण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये कौशल्य प्रयोगशाळा नाहीत त्या शाळा आजूबाजूच्या इतर शाळांतून या सुविधांचा लाभ घेऊ शकतील. करिअरशी संबंधित पर्यायांवर आधारित कौशल्य आधारित अॅप्टिट्यूड टेस्ट आयोजित केली जाणार आहे. याचे आयोजन CBSE आणि NCERT मार्फत होणार आहे. या टेस्टच्या माध्यमातून मुलाच्या भावी व्यवसायाचा शोध घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडूनही काम चालू आहे. सध्या शालेय स्तरावर ५५ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. मार्च २०२१ पर्यंत १३ लाख ५० हजार १७५ विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेचा लाभ मिळाला आहे. या कौशल्य विकास अभ्यासक्रमांमध्ये कृषी, परिधान, वाहन, बँकिंग, वित्त, विमासेवा, सौंदर्य, आरोग्य, उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, माध्यम, मनोरंजन, अनेक कौशल्ये, प्लंबर, वीज, सुरक्षा, दूरसंचार, पर्यटन आणि आदरातिथ्य, वाहतूक रसद, गोदाम यांचा समावेश आहे. आता यापुढे जाऊन प्राथमिक शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली तर देशाचा औद्योगिक विकास सहजपणे होऊ शकेल.

(लेखक प्रयोगशिल शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)